स्‍वप्‍नचिंतामणी


आमच्‍या ऋषीमुनीनी सांगितलेला, हजारो वर्षापासून चालत आलेला, स्‍वप्‍नांचा अचूक अर्थ सांगणारा गुप्‍त, दुर्मिळ व अदभुत

स्‍वप्‍ने का पडतात? स्‍वप्‍न भविष्‍य सांगतात का?

झोपेत स्‍वप्‍न तुम्‍हाआम्‍हा सर्वानाच पडतात. स्‍वप्‍ने न पडणारा मनुष्‍य तुम्‍हाला शोधून पण सापडणार नाही. अर्थात आयुष्‍यात काही असे महाभाग तुम्‍हाला भेटतील जे छातीवर हात मारून सांगतील की, 'आम्‍हाला स्‍वप्‍ने मुळीच पडत नाहीत. गादीवर पडल्‍याबरोबर आपल्‍याला गाढ झोप लागते.' या भापट्यांवर तुम्‍ही मुळीच विश्‍वास ठेवू नका. मनुष्‍याला स्‍वप्‍न न पडणे ही अश्‍यक्‍यच गोष्‍ट आहे. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही झोपेत स्‍वप्‍ने न पडणे ही अशक्‍यच गोष्‍ट आहे. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही झोपेत स्‍वप्‍ने पडणे हितकारक आहे. माणसाला स्‍वप्‍ने ही पडायलाच हवीत. जर स्‍वप्‍ने पडत नसतील तर तुमच्‍यात काही कमी आहे असे निश्चित समजावे. झोपेत स्‍वप्‍ने पडणे ही गोष्‍ट आरोग्‍याला फार फार हितकारक आहे हे लक्षात असूद्या.

स्‍वप्‍नाची दुनिया खरोखरच अलौकिक आहे. स्‍वप्‍नाचा अदभुतपणा तुम्‍ही आम्‍ही सर्वांनीच अनुभवलेला असतो. स्‍वप्‍नसृष्‍टी खरोखरच विलक्षण असते. स्‍वप्‍नात रंकाचा राजा झालेला आपण पाहतो. श्रीमंत मनुष्‍य भीक मागताना पण आढळतो. स्‍वप्‍ने आनंद देणारी असतात तशी भय निर्माण करणारी पण पडतात. स्‍वप्‍नात काहीतरी भयंकर प्रसंग पाहून किंचाळून उठणारी माणसे आपण पाहतोच. स्‍वप्‍ने पाहणारा काही वेळा आनंदाने नाचून उठतो तर काही वेहा भयाने मोठ्याने ओरडतो. स्‍वप्‍नात हेमामालिनी सारखी स्‍वर्गसुंदरी दर्शन होते तर काही वेळा कुब्‍जा पण आपला अमल बजावते.

आपल्‍या शरीराचे सर्व व्‍यापार बंद झाले की आपले शरीर निश्‍चेष्‍ट पडते आणि अशा रीतीने चेतनाहीन अवस्‍था आला की मृत्‍यु आला असे आपण समजतो.

आपण जेव्‍हा रात्री झोपतो तेव्‍हा आपल्‍या शरीराचे सर्व व्‍यापार थांबतात, पण मनाचे खेळ चालूच असतात. शिवाय शरीराच्‍या आतील क्रिया पण चालूच असतात, झोपेत आपल्‍या शरीराचे सारे व्‍यापार थांबतात, पण मनाचे व्‍यापार चालूच राहतात. यावेळी शरीराचे जाऊन व्‍यापार चालू ठेवणारी जी शक्‍ती असते मी माणयाच्‍या मनाच्‍या शक्‍तीमागे जाऊन उभी राहते. अशा रीतीने रात्री निद्रासमयी आपले मन दुहेरी शक्‍तीच्‍या जोरावर काम करते. स्‍वत:चे बळ व रात्रीच्‍या वेळी मिळालेले शरीराचे बळ, या दुहेरी बळाने मनरूपी इंजिनात प्रचंड शक्‍ती निर्माण होते. यामुळे मनाच्‍या विचारशक्‍तीचा वेग फारच वाढतो. यामुळे मेंदूला प्रचंड चालना मिळते. त्‍याचे चक्र खूप जोराने फिरू लागते व माणसाला स्‍वप्‍ने पडू लागतात. यावेळी ही जी दुहेरी शक्‍ती काम करते त्‍यामुळे जे विचार निर्माण होतात ते माणसाला पुष्‍कळदा भविष्‍याची वाट दाखवतात. संकटे कशी टाळावी याचे मार्गदर्शन करतात. या जातीचे मनाचे कार्य काही वेळा इतके तीव्र असते की त्‍याने माणसाच्‍या डोळ्यासमोर उद्या काय घडणार आहे याचे स्‍वष्‍ट चित्र स्‍वप्‍नाच्‍या रूपाने उभे ठाकते.

काही वेळा स्‍वप्‍ने सांकेतिक पडतात. त्‍याचा अर्थ आपणास लागत नाही. आपल्‍या पूर्वजांनी स्‍वप्‍नाचे काही ठोकताळे बसवले आहेत. हे ठोकताळे त्‍यांनी अनुभवाने बसवले आहेत. आपल्‍या ऋषिमुनींनी चिंतन करून स्‍वप्‍नाचा अर्थ आपल्‍याला सांगितला आहे. आपल्‍याकडील स्‍वप्‍नाचा अर्थ सांगणा-या वाड्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. हे वाड्मय अनुभवाने परिपक्‍व आहे. त्‍यात फार खोल विचार भरलेला आहे. ऋषिमुनीनी केलेल्‍या तपाचे सामर्थ्‍य आपल्‍याला माहीतचे आहे. ते खूष होऊन एखाद्याला वर देत तर त्‍याची भरभराट होते असे. ते संतापले व त्‍यांनी शाप दिला तर समोरच्‍या माणसाची क्षणात राख होत असे. एवढे सामर्थ्‍य त्‍यांच्‍या वाणीला होते. दुर्वासऋषीने कुंतीला दिलेला वर व परशुरामाने कर्णाला दिलेला शाप आपल्‍याला माहीतच आहे.

एवढ्या अपूर्व सामर्थ्‍याचे हे ऋषिमुनींनी सांगितलेले शास्‍त्र आज तुमच्‍यासमोर येत आहे, त्‍याचा फायदा आपण घ्‍यावा हीच सदिच्‍छा!

भाग पहला
भूमिसंबंधी
आपल्‍याला दुस-याने भूमिदान केलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास, अविवाहिताचे लग्‍न सुंदर स्‍त्री बरोबर होईल, विवाहितास स्‍त्रीकडून धनप्राप्‍ती होईल. आपले जमिनीस हद्द नाही, असे पाहिल्‍यास त्‍याला पैसा पुष्‍कळ मिळेल, काळी जमीन स्‍वप्‍नामध्‍यें पाहिल्‍यास कष्‍ट प्राप्‍त होतील.

स्‍वप्‍नांत जमीन हाललेलनी पाहिल्‍यास त्‍याचा कार्यभंग होईल. भूकंप झालेला पाहिल्‍यास त्‍याचे सर्व जातीस वाईट; पायाखालची जमीन हाललेली पाहिल्‍यास त्‍याचा दावा बुडेल, अगर पैशाची नुकसानी होईल. पर्वताचा कडा तुटलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास एका प्रसिध्‍द मनुष्‍याचे नुकसान होईल. आपल्‍यास माहीत आहे असे एखादे शहर भूकंपाने उद्ध्‍वस्‍त झालेले पाहिल्‍यास आपल्‍या देशात दुष्‍काळ पडेल. ते शहर आपल्‍यास पाहीत नसल्‍यास आपले आप्‍तवर्ग राहणा-या शहराची खराबी होईल.

आपली सर्व जमीन उत्तम पिकाने भरलेली स्‍वप्‍नात पाहिल्‍यास, आपणास पुष्‍कळ धन मिळेल. आपल्‍या सर्व परसामध्‍ये भाजीची अळी लावलेली पाहिल्‍यास आपल्‍यावर संकटे येतील. आपल्‍या परसामध्‍ये विहिरी, फुलांची झाडे, फळे वगैरे पाहिल्‍यास सु-स्‍वभावाची बायको मिळेल, व कीर्तिमान पुत्र होईल.

धान्‍य न उगवलेल्‍या अशा नांगरलेल्‍या जमिनीत उभा राहिलो आहे असे पाहिल्‍यास, आपल्‍या मुलांबरोबर अगर दुस-या कोणाबरोबर शत्रुत्‍व उत्‍पन्‍न होईल. हेच स्‍वप्‍न नवरीस अगर नव-यास पडल्‍यास त्‍यांचा विवाहसंबंध घडून येणार नाही. विवाहित मनुष्‍याने हे पाहिल्‍यास त्‍यास भांडखोर प्रजा होईल. हेच स्‍वप्‍न व्‍यापा-यास पडल्‍यास त्‍यास व्‍यापारात नुकसानी येईल.

हिरव्‍या धान्‍य उगवलेल्‍या शेतामधून चाललो आहो असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास आपली भरभराट होईल, हिरव्‍या गवताचा भारा आपण उचलून आणला अगर जाग्‍यावरच पाहिला तर शुभ. वाळलेले गवत पाहणे वाईट. शेतामध्‍ये धान्‍यांची कणसे दिसल्‍यास कष्‍टार्जित पैशापासून सुख होईल.

आपणच नांगरताना स्‍वप्‍नात पाहिले असता मान मिळेल. मोठ्या रस्‍त्‍यामध्‍ये चालताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास सौख्‍य, अरूंद गल्‍लीत किंवा गृहेत चालत आहो असे पाहिले असता संकटे येतील. चालताना आपल्‍या बरोबर आपला मित्रही आहे असे पाहिले असता त्‍या मित्राबरोबर विरोध होईल. गृहेमधून बाहेर प्रकाशात आलो असे पाहिल्‍यास संकटे नाहीशी होतील.

आपण तलावात पडलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास संकटे येतील. कुंभाराचे तलावात पडलेले पाहिल्‍यास विधवेबरोबर संभोग घडेल.

देशाचा नकाशा स्‍वप्‍नात पाहिल्‍यास संकटे येतील. व स्‍मशानभूमी पाहिल्‍यास अभिवृद्धि होईल.

घर गाईच्‍या शेणाचे सारवलेले स्‍वप्‍ना पाहिल्‍यास चोर चोरी करून जातील. घर बांधताना पाहिले असता कार्यसिद्धी होईल. ते घर आपले आहे असे वाटल्‍यास धनलाभ. बागेमध्‍ये शिकार करताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास भोग आणि संपत्ती यांची पूर्णता होईल. पुष्‍पांच्‍या बगिच्‍यांतून आपण फिरतो आहो असे पाहिल्‍यास सौख्‍यलाभ. घराच्‍या मधून फिरताना पाहिल्‍यास दूर देशाचा प्रवास घडेल. जंगलामध्‍ये फिरताना पाहिल्‍यास कष्‍ट प्राप्‍त होतील. धर्मशाळेत राहिलेले पाहिले असता दारिद्य येईल व कार्यहानी होईल; किंवा कारागृह भोगावा लागेल, अथवा रोग्‍याचा रोग पुष्‍कळ दिवस राहील. कुंडीत लावलेली झाडे पाहिल्‍यास आपले गृह्य उघडकीस येईल.

भिंतीवर, माडीवर, शिडीवर, अगर घरावर चढलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास उद्योग वृ‍द्धी आणि धनसमृद्धी होईल. याप्रमाणे दुस-यांना चढवताना पाहिले तर शुभवर्तमान समजेल. या वस्‍तू ओलांडून जातो आहे असे पाहिले असता संकटे नाहीशी होतील. यांच्‍यावरून पडतांना पाहिले असता आपले हातून परोपकार घडेल. झाडावर चढताना पाहिले तर मेजवानीचे जेवण, आरोग्‍य आणि धनलाभ. पळस, कडुनिंब, या झाडावर चढलो असे पाहिले असता विपत्ती प्राप्‍त होईल. अशोक, पळस या वृक्षांस पुष्‍पे आलेली पाहिली असता शोक प्राप्‍त होतो.

स्‍वप्‍नांमध्‍ये चिखलात बुडालो असे पाहिले असता मृत्‍यु, देवालय, राजगृह, पर्वताचे शिखर, औदुंबर, आणि फलयुक्‍त वृक्ष यांच्‍यावर चढताना स्‍वप्‍नात पाहिले तर कार्यकिद्धी व द्रव्‍यलाभ होईल. रोग्‍याने हे स्‍वप्‍न पाहिल्‍यास त्‍याचे रोग दूर होतील. पाय-या नसलेल्‍या पहाडावर रांगताना स्‍वप्‍नात पाहिले तर पुष्‍कळ संकटे येऊन शेवटी लोकांकडून मान, कीर्ती आणि धनलाभा प्राप्‍ती होईल. रांगता रांगता पडले असता नीचदशा प्राप्‍त होईल. वर पोहचण्‍यापूर्वीच जागृत झाल्‍यास दु:ख प्राप्‍त होईल. ओल्‍या, भिजलेल्‍या अगर फोडलेल्‍या लहान भिंतीवर चालतो आहे असे पाहिल्‍यास कष्‍टप्राप्‍ती, आणि ती भिंत न पडता आणि अपाय न होता उमरलो असे वाटल्‍यास जय प्राप्‍त होईल. भस्‍म झाली असे पाहिले असता मृत्‍यू सुचविते.

भाग दुसरा
पाण्‍यासंबंधी
आपण समुद्राचे काठी उभे असून आपल्‍या सभोवती लाटा आलेल्‍या स्‍वप्‍नात पाहिल्‍यास आपल्‍यावर दुर्निवार संकटे येतील. जहाजात चढताना पाहिल्‍यास प्रवास घडेल. समुद्रावर जातो असे पाहिल्‍यास धनलाभ, समुद्राचे पलीकडे आपल्‍याला मोठा उद्योग मिळेल. समुद्रामध्‍ये पोहत आहोत असे पाहिल्‍यास धनप्राप्‍ती होईल.

भरलेल्‍या तळ्याच्‍या मध्‍यभागी बसून कमळाचे पानावर जेवताना स्‍वप्‍नामध्‍ये पाहिल्‍यास राज्‍यप्राप्‍ती होईल.

आपल्‍या घरापुढून नदी वाहात आहे असे पाहिल्‍यास काही तरी उद्योग मिळून लोकांमध्‍ये मान मिळेल. पाऊस पडत आहे व नदीस पूर आलेला आहे असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास सर्व देशभर भयंकर रोगाची साथ उद्भवेल. वाहात असलेला प्रवाह मध्‍यंतरीच कोरडा झालेला पाहिल्‍यास कष्‍टाचे निवारण होईल. पाण्‍याचा प्रवाह शेतातून वाहात असलेला दृष्‍टीस पडल्‍यास द्रव्‍यलाभ होईल.

निर्मळ पाण्‍याने पूर्ण भरलेली विहीर पाहिल्‍यास द्रव्‍यलाभ होईल, विहीर भरून पाणी बाहेर वाहात असलेले दृष्‍टीस पडल्‍यास द्रव्‍यनाश, हे स्‍वप्‍न पुरूषांनी पाहिल्‍यास त्‍यांच्‍या मित्रांमध्‍ये अगर आप्‍तांमध्‍ये एकास मरण अगर दुर्दशा प्राप्‍त होईल. बायकांनी पाहिल्‍यास त्‍यांस वैधव्‍य प्राप्‍त होईल अगर पतीवर मोठे संकट गुदरेल. आपण विहिरीतून पाणी काढीत आहे असे पाहिल्‍यास द्रव्‍यलाभ. हे स्‍वप्‍न अविवाहिताने पाहिल्‍यास त्‍याचे लग्‍न होऊन सासूकडून त्‍यास द्रव्‍यप्राप्‍ती. ते पाणी गढूळ असल्‍सास कष्‍ट प्राप्‍त होतील; दुस-याकरिता आपण पाणी काढीत आहो असे पाहिल्‍यास सेवकत्‍व येईल. स्‍नान केलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास रोग. स्‍नान करण्‍याचे पाणी जितके ऊन असेल तितके कष्‍ट जास्‍त. स्‍नान करण्‍याकरिता वस्‍त्र सोडून स्‍नान केल्‍यावाचून परतल्‍यास आप्‍तामध्‍ये भांडण उत्‍पन्‍न होऊन लौकरच शांतता होईल असे समजावे.

निवळ पाण्‍याचा तलाव, ओढा अगर नदी स्‍वप्‍नात पाहिल्‍यास मनातील कार्य सिद्धीस जाईल, शरीरास आरोग्‍य येईल. पाणी गढूळ आहे. असे पाहिल्‍यास मनांतील कार्य सिद्धीस जाणार नाही, शरीर रोगी होईल. पाय धुताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास क्‍लेश होतील. पाणी पीत आहो असे पाहिल्‍यास खेद होईल. आणि मनातील कार्य सिद्धीस जाणार नाही. व्‍यापा-याना व्‍यापारामध्‍ये नुकसानी येईल. कदाचित् त्‍यांना कारागृहवास ही घडण्‍याचा संभव आहे. पाण्‍याची चूळ भरून टाकलेली स्‍वप्‍नात पाहिल्‍यास आलेले संकट दूर होईल. दुखणे बरे होईल. डोके पाण्‍यात बुडवून पोहताना पाहिल्‍यास व्‍यापारात नुकसानी येण्‍याचा संभव आहे. कष्‍ट प्राप्‍त होतील, व आप्‍तांबद्दल वाईट बातमी बातमी ऐकण्‍यात येईल. संथ पाण्‍याचा तलाव पाहिल्‍यास तृप्‍ती वाहत्‍या पाण्‍याकडे टक लावून पाहात असल्‍याचा भास झाल्‍यास अकल्पित धनप्राप्‍ती होते. पाण्‍यावर आनंदाने तरताना पाहील्‍यास मित्रांच्‍या संगतीने सुख प्राप्‍त होईल. निवळ संथ सरोवराच्‍या पाण्‍यातून तराफ्यावरून अगर नावेतून फिरत असताना पाहिल्‍यास, हातात घेतलेला पदार्थ सुवर्ण होऊन मनांत धरिलेले अतिशयीत कठीण कामही सुलभ रीतीने पूर्ण होईल. ते पाणी गढूळ असल्‍यास मोठे दुखणे येईल, व संकटे येतील; पाण्‍यात शेवाळ लागून बाहेर आल्‍यास पैसा मिळतो.

ऊन पाणी पिताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास हेवेखोर मनुष्‍यापासून कष्‍ट होतील. ते पाणी जितके ऊन तितके कष्‍ट जास्‍त; जितके थंड पाणी असेल तितके सौख्‍य जास्‍त; पिण्‍याकरिता कोणी एकाने आपणास तांब्‍याभर पाणी दिलेले पाहिल्‍यास संतानवृद्धी होईल. वरील भरलेला तांब्‍या पडलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास मित्रावर अरिष्‍ट येईल. फुटक्‍या भाड्यात, वस्‍त्रात अगर पिशवीत पाणी घेण्‍याचा निश्‍चय केल्‍याचा भास झाल्‍यास आपणावर संकट येईल. आपल्‍या भवशाचे लोक आपणास फसवितील, निदान आपले घरी चोरी तरी होईल. पाण्‍याची रास अगर भिंत करणे वगैरे असंभवनीय गोष्‍टी पाहिल्‍यास कष्‍टाचे दिवस जवळ आले आहेत असे समजावे. दुस-याने दिलेले पाणी पिताना पाहिल्‍यास कष्‍ट अधिक होतील. सर्व घर पाण्‍याने शिंपडलेले पाहिल्‍यास काही तरी हानी होईल असे जाणावे.

भाग तीसरा
अग्निसंबंधी
अग्नि स्‍वप्‍नात पाहणे चांगले. वारंवार अग्नि पाहणाराचा स्‍वभाव रागीट असतो. दुखणेकरी मनुष्‍याने धुराशिवाय अग्नि पाहिल्‍यास तो लवकर बरा होऊन त्‍याची शरीरसंपत्ती चांगली होईल. निरोगी मनुष्‍याने पाहिल्‍यास द्रव्‍यलाभ व आप्‍तांची भेट होईल. अतिशयीत धूम्‍रयुक्‍त आणि ज्‍वालायुक्‍त अग्नि-कुंडात अगर कुंडाशिवाय पाहिल्‍यास वैमनस्‍य उत्‍पन्‍न होईल; अगर दु:खकारक बातमी ऐकण्‍यात येईल. कोळसे अगर राख पाहिली तर दारिद्रय येईल, अगर कोणाबरोबर तरी वाकडे होईल. हे स्‍वप्‍न दुखणेक-याने पाहिल्‍यास व्‍याधि निवारण होईल.

जहाजात आपण असताना लांबच्‍या गावात दिवे लागलेले स्‍वप्‍नात दिसल्‍यास आपल्‍या आयुष्‍याचे दिवस सुखाने जातील, असे समजावे.

दिवे, मशाल आणि दिवट्या वगैरे चांगल्‍या जळताना पाहणे फारच चांगले. कार्यसिद्धी, द्रव्‍यलाभ आणि संतानवृद्धी होईल. अविवाहित मनुष्‍याचे लग्‍न लवकर होईल आणि आयुष्‍यमान् संतती होईल. दिवे, मशाली आणि दिवट्या वगैरे अंधूक जळताना पाहिल्‍यास किंचित् दुखणे येऊन लागलेच बरे होईल. त्‍याच आपण धरताना पाहिल्‍यास संकटे निवारण होतील, आपले हातून आप्‍त लोकांचे पोषण होईल व मित्रांमध्‍ये आणि लोकांमध्‍ये मान मिळेल. आपण दुस-यांना दिवे वगैरे धरताना पाहिल्‍यास आपणास त्रास देणारे जे असतील त्‍यास पकडले. जाऊन त्‍यास शिक्षा होईल. तेच दिवे अंधुक असल्‍यास त्‍यास देणारे धरले न जाता उलट जास्‍त कष्‍ट प्राप्‍त होतील. दिवा अगर दिवटी आपण लावून त्‍यांचा प्रकाश चांगला पडलेला दिसल्‍यास कुलदीपक मुलगा होऊन वंशाची हळूहळू भरभराट होत जाईल असे समजावे. हेच स्‍वप्‍न स्‍त्रीने पाहिल्‍यास ती लवकरच गरोदर होऊन तिला कुलदीपक मुलगा होईल. आपण दिवा लावण्‍याचा प्रयत्‍न करताना मध्‍यंतरीच वारंवार गेलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास अनेक संकटे येऊन पुत्रशोक होईल. सभेमध्‍ये स्‍वत: दिवा नेत आहे असे पाहिल्‍यास जगामध्‍ये आपली कीर्ती होईल.

घरे धडाधड धुराशिवाय आणि ठिणग्‍यांशिवाय जळताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास बराच फायदा होऊन राजसन्‍मान मिळेल. घर जळताना पुष्‍कळ धूर झाला आहे व विस्‍तवाच्‍या ठिणग्‍या उडत आहेत व घरे जळून राख झाली आहे असे पाहिल्‍यास आपणावर अरिष्‍ट येईल व विनाशकाल प्राप्‍त होईल. स्‍वयंपाकघर जळताना पाहिल्‍यास स्‍वंयपाक करणा-याला त्‍याच प्रमाणे जो जो भाग जळताना पाहावा त्‍या त्‍या भागात काम करणा-या मनुष्‍यास दु:ख प्राप्‍त होईल, घराचे छप्‍पर जळताना पाहिल्‍यास आपली चिजवस्‍तू, वाहन वगैरे चोर लुटून नेतील अगर मित्राला मरण होईल.

घराचा पुढचा भाग अगर दरवाजा जळताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास घरच्‍या मालकास अगर आपणास संकटे प्राप्‍त होतील. रस्‍त्‍यावरची खिडकी अगर दरवाजा जळताना पाहिल्‍यास आप्‍तामधील पुरूषांपैकी मरण जवळ आहे असे समजावे. घराचा मागचा भाग जळताना पाहिल्‍यास स्त्रियांना मरण जवळ आहे असे समजावे.

आसन, बिछाना, पालखी व गाडी इत्‍यादी वाहने, शरीर गृह इत्‍यादिकांना आग लागली असे पाहून जो जागा होईल, त्‍यास लक्ष्‍मी सदासर्वकाळ प्रसन्‍न राहील.

दिवाणखान्‍यातील खांब आणि पलंगाचे खूर याशिवाल सर्व जळताना पाहिल्‍यास मोठा प्रख्‍यात मुलगा होईल. परंतु खांब व खूर जळताना पाहिल्‍यास आपला मुलगा वाईट चालीचा निघून त्‍याचा नाश होईल.

आपल्‍या आप्‍तांचे अगर मित्रांचे वापरण्‍याचे कपडे जळताना पाहिल्‍यास त्‍यांना रोग प्राप्‍त होईल असे समजावे. आपला निजावयाचा पलंग जळताना पुरूषांनी पाहिल्‍यास त्‍याचे बायकोस आणि स्‍त्रीने पाहिल्‍यास तिचे नव-यास दु:ख होईल. ज्‍वाला पेट न घेत असलेला अग्नि पा‍हणे चांगले. आपले शरीर जळून काळे झाले अगर त्‍याला चट्टे पडले व आपण घाबरे झालो, असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास दु:ख प्राप्‍त होईल व लोकांत मत्‍सर जास्‍त वाढेल. आपले बोट अगर पाय जळताना पाहिल्‍यास आपली कृत्‍यचे आणि उद्देश हे वाईट आणि घातक आहेत असे समजावे.

धान्‍याची रास जळताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास अतिवृष्‍टीचे अगर अनावृष्‍टीचे सर्व पिके नाश पावतील. रासीला आग लागली आहे; परंतु धान्‍य सुरक्षित आहे असे पाहिल्‍यास पुष्‍कळ पीक येईल.

सर्व प्रदेश जळताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास दुष्‍काळ पडेल अगर स्‍वर्श अन्‍य रोगाने प्रजेचा म्‍हणजे लोकांचा नाश होईल असे जाणावे.

भाग चवथा
वायूसंबंधी
स्‍वप्‍नात सुगंध, शीतल अशा वायूचा स्‍पर्श झाल्‍यास मनातील सर्व हेतू सिद्धीस जाऊन लोकांत मान्‍यता वाढेल; प्रवासात हे स्‍वप्‍न पाहिल्‍यास त्‍याचा मनोरथ पूण होऊन आनंदाने आपल्‍या घरी लवकर परत येईल. व्‍यापा-यांना त्‍यांच्‍या व्‍यापारात विशेष नफा होईल. शेतकरी लोकांस शेतापासून विशेष धान्‍यसमृद्धी होईल.

वायुचक्र (भूतभवरी) स्‍वप्‍नात पाहिल्‍याने कष्‍ट होऊन शेवटी अभिवृद्धी इत्‍यादी प्राप्‍त होतील. झंझावात (मोठा वारा) अगर भयंकर वादळ पाहिल्‍यास आप्‍तांचा नाश आणि आपणास रोग व कष्‍ट होतील.

आपण स्‍वप्‍नामध्‍ये पतंग उडवितो असे पाहिल्‍यास विशेष भाग्‍योदय, उद्योगाची वृद्धी होऊन त्‍यांत मोठा लाभ होईल व मान मिळेल.

वा-या शिवाय मंद पर्जन्‍य पडताना स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर सुखाने दिवस जातील, हेच स्‍वप्‍न शेतकरी लोकांनी पाहिले तर शेतीपासून लाभ होईल असे जाणावे. पाऊस येऊन पडताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास सर्व देशांस विपत्ती येईल, व स्‍वत:स दु:ख, रोग इत्‍यादी प्राप्‍त होईल.

भाग पाचवा
आकाशसंबंधी
स्‍वप्‍नामध्‍ये आकाश पाहणे चांगले, आकाश स्‍वच्‍छ आणि निरभ्‍र असे दिसल्‍यास श्रेष्‍ठत्‍व प्राप्‍त होईल, व इच्छित कार्य सिद्धीस जाईल, शत्रूपासून जय मिळेल. गेलेले धन मिळेल व वादात जय मिळेल. आकाश अभ्‍राने आच्‍छादित नीलवर्णाचे आहे असे दिसेल तर आपणास विपत्ती प्राप्‍त होण्‍याची लक्षणे समजावी. शिवाय रोग व लोकांशी शत्रुत्‍व होईल. स्‍वप्‍नांमध्‍ये आकाश नीलवर्णाचे असून चोहोकडून श्‍वेतवर्णाचे आभ्‍राने व्‍यात होत आहे असे पाहिल्‍यास आपणाला विपत्तीकाल प्राप्‍त होईल व त्‍या संकटातून मुक्‍तताही होईल, आकाश लाल वर्णाचे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास रोग होईल, संध्‍याकाळचा संधीप्रकाश पाहिला असता, आपल्‍या घरामध्‍ये कोणाला तरी व्‍याधी उत्‍पन्‍न होण्‍याची लक्षणे समजावी. हेच स्‍वप्‍न व्‍यापारी लोकांना पडले असता त्‍यांना व्‍यापारापासून नुकसान होण्‍याचा संभव आहे. व ही दोन्‍ही स्‍वप्‍ने जर अविवाहित मनुष्‍याने पाहिली तर त्‍याचा विवाह होईल.

सूर्यमंडळ व चंद्रमडळ यास जो मनुष्‍य स्‍वप्‍नात पाहतो त्‍याला द्रव्‍यलाभ होऊन कार्यसिद्धी होते. चंद्र व सूर्य हे प्रभाहीन (म्‍हणजे निस्‍तेज) असे पाहिले असता मृत्‍यु जवळ आहे असे समजावे किंवा अति दु:ख तरी होईल.

सूर्योदय होत असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास कार्यसिद्धी. इष्‍टमित्र व बांधव यांस क्षेम, सूर्यसमुद्रातून वर येतो आहे असे स्‍वप्‍नात पाहिले तर सौख्‍यप्राप्‍ती होईल, प्रात:काळ होत आहे असे स्‍वप्‍नात पाहिले तर द्रव्‍यलाभ, उद्योगवृद्धी, आरोग्‍यप्राप्ति, कैद्याची तुरूंगापासून मुक्‍तता आणि द्रव्‍यलाभ सुचविते. बायकांना सूर्यदर्शन झाले तर पुत्रलाभ सूर्यास्‍त होत आहे असे पाहिल्‍यास मुलगी होईल. व व्‍यापा-यांचा नाश होईल, सूर्य अभ्‍राने झाकलेला आहे असे पाहिले तर घर दहन होईल, सूर्यकिरण पाहिले तर लाभ. किरणे अंथरूणावर पडली असे पाहिले तर रोग उद्-भवेल. आपल्‍या खोलीभर ऊन पडलेले आहे असे पाहिल्‍यास, द्रव्‍यलाभ, मान, संतती इतर प्राप्‍त होतील. सूर्यबिंबाला ग्रहण लागले आहे असे दिसणे हे फार वाईट. हेच स्‍वप्‍न भीती बाळगणाराला चांगले. गर्भिणी स्‍त्रीने असे स्‍वप्‍न पाहिले तर तिला कीर्तिमान असा मुलगा होईल. अपराध्‍याला आपले डोके सूर्यकिरणांनी वेष्टिलेले आहे असे पाहिले तर तो बंधनात असला तरी मुक्‍त होतो. हेच स्‍वप्‍न इतरांस पडले तर तो राजसन्‍मानास पात्र होईल.

चंद्रोलय होऊन शुभ्‍र असे चांदणे पडले आहे असे जो पाहतो;त्‍याला सर्वानुकूलता प्राप्‍त होते. चंद्र अभ्‍राने झाकलेला किंवा त्‍याला ग्रहण लागले आहे असे दिसेल, तर आपल्‍या घरातील एखाद्या स्‍त्रीस रोग उद्-भवेल किंवा चोर आपले घर लुटतील. हेच स्‍वप्‍न प्रवाशांना विपत्तिकारक. चंद्र मनुष्‍याचे मुखासारखे प्रकाशलेला दिसेल तर धनलाभ, पूर्णचंद्र पाहिला तर संततिदायक. आपले डोके चंद्रकिरणांनी वेष्टिलेले आहे असे पाहिले तर तो प्रसिद्धीस येईल. हेच स्‍वप्‍न कैद्याने पाहिले तर तो कैदेतून सुटेल.

नक्षत्रांचा चकचकीत प्रकाश पाहिल्‍यास अभिवृद्धी, प्रकाश मिणमिणीत असा दिसेल तर दु:खकारक. आकाशामध्‍ये मुळीच नक्षत्र नाही असे पाहिले असता श्रीमंताना दारिद्रय व दरिद्र यांना रोगप्राप्‍ती. आकाशामध्‍ये मुळीच नक्षत्र नाही असे पाहिले असता श्रीमंताना दारिद्र्य व दरिद्री यांना रोगप्राप्‍ती. हे स्‍वप्‍न अपराधी मनुष्‍य पाहील तर भीतीपासून मुक्‍त होईल. नक्षत्रे पडताहेत असे पाहिले तर मृत्‍युकारक, तारे आपल्‍या घरावर पडले आहेत असे स्‍वप्‍नात पाहिले तर रोग उत्‍पन्‍न होतो किंवा घर सोगावे लागते. एखाद्या घरामध्‍ये नक्षत्रे प्रकाशत आहेत असे पाहिले तर घराचे मालकाचा नाश, शेंडेनक्षत्र पाहिले तर विपत्ती प्राप्‍त होईल, शिवाय रोगही होईल.

इंद्रधनुष्‍य पूर्वेला पाहिले तर गरिबांना चांगले व श्रीमंताना वाईट. आणि पश्चिम दिशेला पडलेले पाहिले तर श्रीमंताना चांगले व गरिबांना वाईट.

आपण आकाशात उडतो असे पाहिले तर कार्यसिद्धी होईल असे समजावे.

विजांचा च‍कचकाट हे स्‍वप्‍नात पा‍हणे फार चांगले. विजेच्‍या प्रकाशाने डोळे दिपले असता किंवा तिची गर्जना ऐकी असता अगर ती एखादे ठिकाणी पडून तिच्‍या योगाने स्‍वत:ला अगर परक्‍याला किंवा एखाद्या कोणत्‍याही वस्‍तूस अपाय झालेला पाहणे वाईट, विपत्तिकाल प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नामध्‍ये आपणावर वीज पडेत होती परंतु काही कारणामुळे ती चुकली असे पाहणे चांगले. विपत्तिकाल असल्‍यास निघून जाईल. वीज आपल्‍या अंगाला न लागता बाजूला अगदी जवळ पडली असे जो पाहतो त्‍याला दूरदेशी प्रयाण होऊन सौख्‍य होईल. हेच स्‍वप्‍न प्रवाशांना वाईट, आकाशात अभ्‍र आहे असे असून विजेची गर्जना अगर चमक होत असणे हे चांगले. व्‍यापारी, शेतकरी आणि नोकरी करणारे लोक यांना ज्‍यांच्‍या त्‍यांच्‍या कामात लाभ होईल. तंट्यात यश होईल. इतरांनी पाहिले तर आप्‍त लोकांकडून काहीतरी लाभ होईल असे जाणावे.

भाग सहावा
जीवासंबंधी
स्‍वप्‍नामध्‍ये मुंग्‍या पाहणे चांगले. त्‍या द्रव्‍यलाभ सुचवितात. मुंग्‍या एकामागून एक ओळीने चालताना पाहिल्‍या तर प्रयाण होईल. व्‍यापा-यांना द्रव्‍यलाभ. मुंग्‍या जिकडेतिकडे पळत आहेत असे पाहिले असता, शरीर पीडा, तोंडात भक्ष्‍य धरून नेत असलेल्‍या मुंग्‍या पाहणे चांगले. मुंगीला इतर प्राणी खातात अगर मारतात, असे स्‍वप्‍नात पाहिले असता आपणाला विपत्ती प्राप्‍त होणार असे जाणावे. स्‍वप्‍नात काळ्या मुंग्‍या पाहिल्‍या तर द्रव्‍यलाभ व लाल मुंग्‍या पाहिल्‍या तर धान्‍यलाभ. मुंग्‍या तोंडामध्‍ये अंडी धरून नेत आहेत असे पाहिले असता धननाश.

स्‍वप्‍नात मुंगळे (डोंगळे) पाहणे चांगले. मुंगळ्यानी आपणला दंश केला असे पाहिले तर द्रव्‍यलाभ होणार असे समजावे. मुंगळे मेलेले पाहिले तर दुष्‍काळ पडेल. मुंगळ्याना कोणी जीव धरून नेत आहेत असे पाहिले तर शत्रुभीती.

उवा व ढेकूण स्‍वप्‍नात पाहिले तर आपल्‍या उद्योगात विघ्‍न करण्‍याविषयी व आपला नाश करण्‍याविषयी कोणी प्रयत्‍न करीत आहेत असे समजावे.

स्‍वप्‍नात सरडा पाल वगैरे पाहिली असता अशुभ जाणावे. डांस वगैरे जंतू दंश करून आपल्‍याला त्रास देतात असे पाहिले तर तंटे-भांडणे होऊन पुष्‍कळांशी शत्रुत्‍व होईल.

स्‍वप्‍नात गोचिड, वगैरेना पाहिले तर काहीतरी व्‍याधी होईल. हिरवी कीड पाहिली तर भोजनलाभ. कांतणीला पाहिली तर दारिद्रय, कांतणीचे घर पाहिले तर शुभ.

चिलटे, माशा, डांस, गांधीलमाश इत्‍यादी पंख असलेले कीटक पाहिले तर विपत्तिकाळ प्राप्‍त होईल. रोग्‍यांनी पाहिले तर रोग दूर होईल. आपल्‍या आंगभर माशा चिकटल्‍या आहेत असे जो पाहतो त्‍याला पुष्‍कळ शत्रु होऊन शिवाय बायको जारिणी होते.

स्‍वप्‍नामध्‍ये मधमाशी पाहणे चांगले. ही मक्षिका चावल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर त्‍याची वर्तणूक बिघडून तो निंदेस पात्र होतो. आणि त्‍या मध जमवून ठेवीत असताना पाहिले तर लाभ. माशांनी घराच्‍या कवलाराला पोळे केले असे जो पाहतो त्‍याला सौख्‍य प्राप्‍त होते. माशा उडत असताना पा‍हणे गरिबांना चांगले व श्रीमंतांना वाईट.

स्‍वप्‍नात जळवा अगर वाणी पाहणे सौख्‍यकारक, घोरपड पाहिली असता काहीतरी विघ्‍न येईल असे जाणावे.

विंचू पाहणे वाईट, विंचूने आपल्‍याला दंश केला असे जो पाहतो त्‍याने आपणास शत्रू पुष्‍कळ आहेत व ते आपला नाश करण्‍याविषयी प्रयत्‍न करतात असे जाणावे. विंवूना आपण अगर दुसरा कोणी मारीत आहे असे पाहणे चांगले. आपण विंचूना मारीत असता जर तो पळून गेला असे पाहिले तर वाईट. कोणाबरोबर तरी शत्रुत्‍व होईल्‍ असे समजावे.

सर्प पाहणे चांगले संततीदायक. त्‍यात पांढ-या सर्पाला पाहिले तर फारच चांगले. पांढ-या सर्पाने उजव्‍या भुजेस दंश केला असे पाहिल्‍यास दहा दिवसांनी पुष्‍कळ द्रव्‍य मिळेल म्‍हणून समजावे. लाल, हिरवे रंगाचे सर्व स्‍वप्‍नामध्‍ये कोणी पाहिले तर धननाश. उदकामध्‍ये उभे असता विंचू, सर्प यांनी दंश केला असे पाहिले तर जय, पुत्र, धन यांची प्राप्‍ती होते. सर्प आपले घरामध्‍ये प्रवेश करताहेत असे पाहिले तर कोणाबरोबर तरी विरोध होईल. ते विळखा घालून पडलेले आहेत किंवा त्‍यांना कोणी बांधले आहे असे पाहिले तर अती दु:ख, त्‍यांना आपण अगर दुस-यांनी ठार मारिले असे स्‍वप्‍न पडले तर जय. मासे, बेडूक यांना पाहिले तर चांगले. कुजलेले मासे पाहिले तर रोग, आपण मासे धरीत आहो असे स्‍वप्‍न पडले तर लाभ. मासे आनंदाने पोहतात असे स्‍वप्‍नात पाहिले तर आनंदाने दिवस जातील. कासव पाहिले असता अती श्रम व गमन होऊन यश, धन प्राप्‍त होईल असे समजावे. मगर पाहणे वाईट. मगर आपणास धरून नेत आहे असे पाहणे चांगले. निरूपद्रवी जंतू पाहिले असता सौख्‍य व क्रूर उपद्रवी जंतू पाहिले तर कष्‍टप्राप्‍ती असे समजावे.

स्‍वप्‍नामध्‍ये मुंगूस पाहणे चांगले. मुंगूस सर्पास मारीत आहे असे पाहिले तर शत्रुनाश.

उंदरांना पाहणे वाईट. उंदीर घरात पोखरतात असे पाहिले तर द्रव्‍यनाश. चावल्‍यासारखे अगर पाठीस लागल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर रोग आणि विपत्ती प्राप्‍त होईल असे समजावे. उंदीर घरामध्‍ये फिरत आहेत असे स्‍वप्‍न पडले तर आपला नाश करण्‍याच्‍या हेतूने पुष्‍कळ लोक आपल्‍याशी स्‍नेह जोडतील असे समजावे. ससा पाहिल्‍यास बंधु-दर्शन व धनलाभ.

भाग सातवा
पशूसंबंधी
स्‍वप्‍नामध्‍ये हत्ती पाहणे चांगले. याच्‍या योगाने चिंतिले कार्य सिद्ध होईल. हत्तीवर बसल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर विद्वान व सर्वमान्‍य मुले होतील.

उंटाला स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर जलप्रवास व भूमिपर्यटण पुष्‍कळ होऊन त्‍यामुळे जिवाला त्रास होईल. व ती दु:खे न जुमानिता भोगिली तर आरोग्‍य व धन प्राप्‍त होईल घरी लवकर येणे होईल. उंटावर बसलो आहो असे स्‍वप्‍न पाहिले तर व्‍याधी होईल.

घोड्याला स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे चांगले. यात्रा घडेल व स्‍नेही मनुष्‍य भेटेल. घोड्यावर बसल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर बायकोपासून किंवा मित्रांपासून द्रव्‍यलाभ व दूरदेशी गमन होऊन तेथे सौख्‍यप्राप्‍ती. घोड्यावरून पडलो अस स्‍वप्‍न पडले तर थोडक्‍याच कालात दु:खे उद्भवतील.

गाढव पाहिले असता कष्‍ट, गाढवावर बसलो आहो, अगर गाढव जुंपलेल्‍या रथात बसलो आहो, असे पाहणे मृत्‍युकारक किंवा भयंकर व्‍याधी होईल असे समजावे. आपण गाढवाला मारीत आहो असे स्‍वप्‍न पडले तर आपली दु:ख निवारण होतील. गाढव न डगमगता ओझी वाहून नेत आहे असे पाहिले तर संकटे दूर होतील. शिवाय स्थिरतेने द्रव्‍यलाभही होईल. गाढव आपले मागे येत आहे असे पाहणे वाईट.

स्‍वप्‍नात बैल पाहणे चांगले. बैलावर बसलो आहो असे जो पाहतो त्‍याला धनलाभ होतो. बैलाने हरत-हेने आपणास मारले किंवा तुडविले असे पाहून जो जागा होतो, त्‍याला लोक अधिकारहीन करण्‍याचा प्रयत्‍न करितात असे समजावे. बैल आपल्‍या पाठीस लागला आहे असे जर पुरूषाला स्‍वप्‍न पडले तर आपला नाश करण्‍याचा कोणी दीर्घ प्रयत्‍न करीत आहे असे समजावे. हेच स्‍वप्‍न बायकांनी पाहिले तर आपल्‍या वरचे नव-याचे प्रेम कमी झाले असे समजावे.

गाईला पाहणे चांगले. त्‍यात पांढ-या गाईला पाहणे फारच चांगले. गाईचे दूध आपण काढतो आहो किंवा दुसरा कोणी काढीत असताना पाहिले तर तंटे-भांडणे होतील.

म्‍हशी व रेडे स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे वाईट. त्‍यांच्‍यावर आपण बसलो आहो असे पाहिले तर मृत्‍यु जवळ आहे असे समजावे.

पशूंचा समुदाय येत आहे असे जर पुरूषांनी स्‍वप्‍न पाहिले तर ते अपकीर्तीस पात्र होतात. व बायकांनी पाहिले तर आपल्‍या पतीला दुसरी स्‍त्री मोहित करिते आहे असे समजावे. एखाद्या किरव्‍यागार रानामध्‍ये गुरांचा समुदाय चरत असलेला स्‍वप्‍नामध्‍ये दृष्‍टीस पडेल तर चांगले. गुराख्‍याने आपण गुरे हाकून नेतो आहे असे पाहिले तर नाश. इतर लोकांना स्‍वधंद्यात द्रव्‍यलाभ. शेळीला आणि बक-याला स्‍वप्‍नात पाहिले तर धान्‍यसमृद्धी, पण मुले अल्‍पयुषी जन्‍मतील, मांजराला स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर वाईट, तो परनिंदेस पात्र होईल. मांजरे आपले घरामध्‍ये फिरत आहेत असे पाहिले तर मित्रबांधवापैकी कोणी द्रव्‍य चोरून आपला नाश करतील असे समजावे. मांजर उंदराला धरीत आहे असे पाहणे चांगले. मांजराला आपण ठार मारल्‍यासारखे किंवा बांधल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर आपले घरामध्‍ये चोर पकडला जाऊन कारागृहात पाठविला जाईल. बायकांनी मांजरे पाहिली तर नव-यापासून अपमान होईल.

कुत्र्याला पाहणे चांगले. कुत्रा आपले जवथ्‍ येतो असे स्‍वप्‍न पाहिले तर जीवश्‍च कंठश्‍च असे नवे स्‍नेही होतील. कुत्रा आपल्‍याबरोबर फिरत आहे असे पाहिले तर आपल्‍याला संकटांतून सोडविणार स्‍नेही आहेत. असे समजावे. कुत्रा आपल्‍यास पाहून भुंकत आहे किंवा आपल्‍यास चावत आहे असे पाहिले तर प्रियकर मित्रामध्‍ये देखील शत्रुत्‍व होईल असे समजावे.

कोल्‍ही स्‍वप्‍नात पाहणे नाशकारक. माकड पाहिले तर कलह होईल. माकड आपल्‍याला ओरबडतो आहे असे पाहिले तर धननाश. ते आपले घरामध्‍ये आलेले पाहिले तर विश्‍वासघात करावा अशा हेतूने एक मनुष्‍य आपले घरात शिरेल असे समजावे. श्रीमारूतीला स्‍वप्‍नात पाहिले तर जय. बाली, सुग्रीवाला पाहिले तर प्रिय दर्शन.

वाघ, सिंह, लांडगा, अस्‍वल, बिवटा इ. घातक पशूंना स्‍वप्‍नात पाहिले तर थोर मनुष्‍याशी द्वेष होईल. आणि ती चावल्‍यासारखी स्‍वप्‍न पडले तर विपत्तिकारक व त्‍यांना ठार मारल्‍यासारखे वाटले तर जय.

स्‍वप्‍नात हरण पा‍हणे चांगले, हरणाची पारध करीत असताना पाहिले तर वाईट. अन्‍य पशू सौम्‍य पाहिले तर सौख्‍यकारक व क्रूर पशू पाहिले तर दु:खकारक.

भाग आठवा
पक्ष्‍यासंबंधी
चिमणी, मैना यांना स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे चांगले. आणि त्‍या एकमेकांस मारहाण करीत असताना पाहिले तर दु:खप्राप्‍त होईल. त्‍या उडत असताना पाहिले तर चांगले. दाणे वेचीत असताना पाहिले तर उद्योगवृद्धी. कबुतर स्‍वप्‍नात पाहणे वाईट. शोकप्राप्‍त होईल.

कोकिळा पाहिली किंवा तिचे गायन ऐकिले तर ज्‍या स्‍त्रीची इच्‍छा असेल ती स्‍त्री फार श्रमाने प्राप्‍त होईल. बायकांनी जर हेच स्‍वप्‍न पाहिले तर आपल्‍या नव-याने इतर स्‍त्रीपर नजर ठेविली आहे असे जाणावे. कावळ्याला स्‍वप्‍नामध्‍ये पाहिल्‍यास व्‍यापारहानी होईल. कावळा उडत असताना पाहिले तर वाईट. कावळा ओरडल्‍याचे ऐकले तर नाश. आपल्‍या डोक्‍यावरून कावळा उडाल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर गंडांतर आहे असे समजावे. कावळ्याचे मैथून स्‍वप्‍नात पाहिले तर धान्‍यलाभ. घारीला पा‍हणे दु:खकारक.

मोराला स्‍वप्‍नात पाहिले तर विशेष धनप्राप्‍ती आणि संतानवृद्धी. अविवाहित मनुष्‍याने पाहिले तर लवकरच विवाह होऊन सासूकडून द्रव्‍यलाभ होईल असे जाणावे. स्‍त्रीला जर हेच स्‍वप्‍न पडले तर यात्रा घडेल व पुराण कीर्तन इत्‍यादी ऐकण्‍याचा लाभ होईल.

राजहंस स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे शुभ. शेतक-यांना धान्‍य लाभ. प्रवाशांना हेच स्‍वप्‍न पडल्‍यास आपण मेलो अशी स्‍वदेशामध्‍ये प्रसिद्धी होईल. व इतरांना दूरदेशी प्रयाण होऊन जिवाला सौख्‍य मिळेल व कीर्ती वाढेल असे समजावे. भारद्वाज पक्षी पाहिला तर धनलाभ व यश.

चक्रवाक किंवा चातक पक्षी पाहिला तर किंवा त्‍याचा शब्‍द ऐकिला तर महदैश्‍वर्य प्राप्‍त होईल. गिधाडाला पाहिले तर चोरभय. गरूड पक्षी पाहिला तर कार्यसिद्धी.

घुबड किंवा वाघुळ पाहिले तर धनहानी, स्‍वप्‍नात बगळा (बाळभोक) कोंबडी आणि क्रौंच पक्षीण यास पाहिले असता स्‍त्रीप्राप्‍ती.

स्‍वप्‍नात पोपटपक्षी पाहिला तर भोजनलाभ. पक्षी उडतात असे पाहिले तर श्रीमंताना दारिद्र्यता व दरिद्री यांना धनप्राप्‍ती. पिंज-यातून पक्ष्‍याला बाहेर काढल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर कार्यसिद्धी व व्‍यापा-यांना लाभ. शेतक-याना धान्‍यलाभ. पक्ष्‍याला आपण अन्‍य कोणत्‍याही प्रकाराने धरले असे स्‍वप्‍नात पाहिले तर भाग्‍य, ऐश्‍वर्य ही प्राप्‍त होतील.

पक्ष्‍यांचा घरटा अकस्‍मात् सापडून त्‍यात पिले अगर अंडी आहेत किंवा नाहीत असे नजरेने पाहिल्‍यासारखे स्‍वप्‍न पडेल तर शुभ. पक्ष्‍यांचा घरटा शोधण्‍याकरता पळत जाणे आणि तो सापडणे, व त्‍यात पिले किंवा अंडी नसणे, असे पाहिल्‍यास आपण ज्‍या लाभाकरिता झटतो तो सफल होणार नाही. अंडी असलेले घरटे पाहिले तर धनलाभ. आपल्‍या परसात किंवा घरच्‍या कवलाराला अंडीसुद्धा असलेले घरटे सापडले आणि ते आपण काढून टाकले असे स्‍वप्‍न पडले तर दारिद्र्यता. उडता येत नाही अशा पक्ष्‍याचे घरटे स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर तंटे-बखेडे उत्‍पन्‍न होऊन अपजय होईल. स्‍वप्‍नामध्‍ये अंडे वजनाने अगदी हलके वाटले तर हातामध्‍ये धरलेले सर्व पदार्थ सोने होईल. स्‍वप्‍नात अंडी खाल्‍यासारखे वाटले तर दारिद्र्य प्राप्‍त होईल.

भाग नववा
धातूसंबंधी व (अलंकारासंबंधी)
सोन्‍याचे नाणे पाहिले तर शुभ कार्यसिद्धी होईल. स्‍वप्‍नात सोन्‍याची अंगठी हातात घातली असे पाहिले तर दांपत्‍यात प्रेमवृद्धी; पण ती हरवली असता कलह उत्‍पन्‍न होईल. मौल्‍यवान दागिना गळ्यात घातला असे स्‍वप्‍न पाहिले तर दूर देशामध्‍ये द्रव्‍य मिळेल. आपण सोन्‍याचे नाणे दुस-या मनुष्‍याला दिल्‍यासारखे वाटले तर पुष्‍कळ स्‍नेही होतील, परंतु ते नाणे आपण फेकून दिल्‍यासारखे वाटले तर आपले घरी चोरी होईल असे समजावे. आपण नाणे वेचून घेतल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर जयप्राप्‍ती. सोन्‍याची रास पाहिली तर दारिद्र्य.

स्‍वप्‍नात रूपे पाहिले तर कार्यनाश. रूप्‍याची अंगठी हातात घातली असे पाहिले तर उत्तम. तांबे पाहिले तर शुभ. पितळ पाहिले तर आपला कोणी विश्‍वासघात करण्‍याचे बेतात आहे असे समजावे. कासे पाहिले तर जय. शिसे पाहिले तर कलह होईल. लोखंड पाहिले तर दारिद्र्य. जस्‍त पाहिले तर लाभ.

तांब्‍याचे नाणे पाहिले तर देवभक्‍ती घडेल. रूप्‍याचे नाणे पाहिले तर वाईट. द्रव्‍याने भरलेली पिशवी पाहिली तर संतानवृद्धी होईल; ती फेकल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर आपल्‍या एका मित्राला आढ्यता प्राप्‍त होईल असे समजावे. द्रव्‍याची पिशवी आपण घेतली असे पाहिले तर वाईट.

भाग दहवा
मनुष्‍यासंबंधी
स्‍वप्‍नात ब्राह्मणाला पाहणे रोगदायक. सोवळे नेसलेला ब्राह्मण किंवा पुरोहित यांस पाहिले तर अग्नि भय. क्षत्रिय पाहिला तर आरोग्‍य, वाणी लोकांना पाहिले तर लाभ. शूद्राला पाहिले तर सुखप्राप्‍ती, म्‍हेच्‍छ पाहिला तर भीती. महार, मांग भंगी इ. अति शूद्र पाहिले तर दु:खदायक. संकर जातीच्‍या मनुष्‍यापैकी, कोणास पाहिल्‍यास व्‍याधी. राजवर्गापैकी कोणा माणसास पाहिल्‍यास क्षेमवृद्धी. आई, बाप, गुरू किंवा वडील मनुष्‍य यापैकी कोणी पाहिल्‍यास लाभ. पुरूषाने लहान मुलाला पा‍हणे चांगले. परंतु बायकांनी पाहिल्‍यास वाईट. कुजलेल्‍या अंगाचे मूल पाहिले तर मित्रद्रोह घडेल. मूल जन्‍मताना पाहिले तर सौख्‍यकारक. मुलाचा मृत्‍यू पाहिल्‍यास धननाश, पण अविवाहित मुलीने पाहिल्‍यास तिचा विवाह लवकर होईल. बायकांना हेच स्‍वप्‍न पडल्‍यास धनलाभ. सकेश डोक्‍याचा मनुष्‍य पाहिला तर आलस्‍यपणा आणि स्त्रियांपासून नाश. विधवेला पाहिली असता दुष्‍काळ किंवा रोगोत्‍पत्ती होईल म्‍हणून समजावे. प्रेताला पाहिले तर भोजनलाभ, किंवा नूतन वस्‍तूंची प्राप्‍ती. कुबड्या मनुष्‍याला पाहिले तर दु:खकारक. जादुगाराला पाहिला तर दु:ख प्राप्‍त होईल. शत्रूला पाहून त्‍याच्‍या बरोबर बोलल्‍यासारखे किंवा भांडल्‍यासारखे वाटेल तर कष्‍ट प्राप्‍त होतील. स्‍वप्‍नांमध्‍ये शत्रू आपल्‍या क्षेमाची इच्‍छा करतील तर जय. मेलेल्‍या वडील माणसांना पाहिल्‍यास कार्यसिद्धी आणि धनलाभ, मेलेल्‍या मनुष्‍याबरोबर आपण बोलत आहो असे स्‍वप्‍न पाहिले तर आपली प्रसिद्धी होईल. पिशाच्‍च पाहिले तर कार्यनाश. स्‍वप्‍नात 'नग्‍न कुमारी' पाहिली तर उदासिनपणा. स्‍वप्‍नांमध्‍ये सुंदर अलंकार धारण केलेल्‍या सोभाग्‍यवती स्त्रिया पाहिल्‍या तर इष्‍ट कार्य किंवा मंगलकारक सिद्ध होतील असे जाणावे.

भाग अकरावा
स्‍वत:संबंधी
आपण हीन कुलामध्‍ये जन्‍मास आलो असे स्‍वप्‍न पाहिले तर लाभ, आपण आंधळा झालो असे दिसले तर स्‍नेही मनुष्‍यापासून नाश, शिवाय बायको जारिणी होऊन अपकीर्ती करील. आपण बहिरे झालो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास आपल्‍यास कपटी स्‍नेही मिळतील. आपणास वेड लागलेले आहे किंवा आपण वेड्याजवळ उभा आहो असे पाहिल्‍यास संतती प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नात आपण लंगडे झालो असे पाहिल्‍यास कष्‍टकारक, आपण पळत आहो असे पाहिल्‍यास आपल्‍यावर कितीही संकटे आली तरी ती दूर होऊन कार्यसिद्धी होईल. स्‍वप्‍नात आपला पाय मोडला असे पाहिल्‍यास मित्रबुद्धीने अगर स्‍त्रीबुद्धीने कार्यनाश. आपण पायाला लाकडाचा कोवाडा बांधून चालत आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास दारिद्र्य. आपले हात पूर्वी पेक्षा फार लठ्ठ झाले आहेत असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास मोठी नोकरी मिळेल. आपले हात मोडल्‍यासारखे अगर जळल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर गरीबी येईल. हेच स्‍वप्‍न बायकांनी पाहिले तर मुलगा किंवा नवरा मृत्‍यू पावेल. आपण उजव्‍या हाताने काही काम करीत आहो असे पाहिल्‍यास शुभ. हातावर केश वाढले आहेत असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास कारागृहास प्राप्‍ती होईल. स्‍वप्‍नात टाळूपासून रक्‍त वाहात आहे असे दिसल्‍यास दु:ख होईल. आपणाला शिंगे आहेत असे स्‍वप्‍न पडल्‍यास धनलाभ होईल असे जाणावे. आपले डोके उंच व मोठे आहे असे पाहिल्‍यास मोठा अधिकार मिळेल. आपले डोके कोणी परक्‍याने कातरले असे पाहिल्‍यास बायकोला किंवा मुलाला वाईट. आपले डोके सिंह, लांडगा, वाघ, इत्‍यादी क्रूर जनावरासारखे आहे असे पाहिल्‍यास जय. घोडा, क्रुत्रा गाढव यांच्‍यासारखे आपले डोके आहे असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास कार्यविमुखता. पक्ष्‍यासारखे आपले डोके आहे असे स्‍वप्‍न पाहिले तर त्‍याचे फळ देशाटन करावे लागेल. आपले डोके विंचरलेले आहे असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास आरंभीलेली कामे सुयंत्रपणे तडीस जातील. डोके पाण्‍याने धूत आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास नाशकारक. गर्भपात झाल्‍यासारखे वाटल्‍यास लवकरच दु:खमुक्‍तता होईल. आपली दाढी लांब आहे असे पाहिल्‍यास अभिवृद्धी. आपले मुख कोमेजलेले आहे असे दिसले तर द्रव्‍यलाभ, आपले दात दुखत आहेत असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास काही तरी उद्योग मिळाल्‍याबद्दल वर्तमान येईल. दात पडल्‍यासारखे किंवा डोक्‍याचे केस गुंतल्‍यासारखे दिसल्‍यास द्रव्‍यनाश. आणि दूर देशी प्रयाण, वांती झाल्‍यासारखे किंवा शोचाला झाल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर गरीबाला धनलाभ आणि श्रीमंताना दारिद्रता प्राप्‍त होईल. उताणे निजून मोठ्याने हासल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिल्‍यास दु:खप्राप्‍ती. निद्रा, आहार सोडून आणि पर्जन्‍य, ऊन काही न जुमानता आपण तपश्‍चर्या करतो आहो असे पाहिल्‍यास आपले हातून परोपकार घडेल. आपण एखाद्यावर रागावलो आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास तो आपला स्‍नेही होईल. आपण दुस-याला मारिले असे स्‍वप्‍न पाहिले तर आपली स्‍तुती दुसरे करतील. हत्‍यारे इत्‍यादिकांपासून आपण मार खाल्‍ला असे स्‍वप्‍न पाहिले तर अपकीर्ती होईल. विपत्तीकाल प्राप्‍त झाला असे पाहिल्‍यास अभिवृद्धी. आपण परक्‍याचा विपत्तीकाल पाहिला तर आपले स्‍नेही कुत्सित आहेत समजावे.

मनुष्‍याने आतडे आपल्‍या गळ्यामध्‍ये घालून ग्राम मध्‍येभागी आपण उभे आहो असे पाहिल्‍यास पुष्‍कळ ग्रामावरचा अधिकार मिळेल. स्‍वप्‍नामध्‍ये लग्‍न होत असलेले पाहिले तर मरणाची बातमी समजेल. लग्‍नाला आपण साहाय्य केले असे पाहिले तर काहीतरी शुभवर्तमान समजेल. म्‍हातारीचे लग्‍न केल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर धनलाभ. नुकतेच लग्‍न झालेल्‍या मुलीला आपण विधवा झाली असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास ती जन्‍म सुवासिनी राहून तिला पुष्‍कळ मुले होतील.

जारकांची उत्‍सुकता असूनही स्‍वप्‍नांमध्‍ये तो योग न घडेल तर कार्यसिद्धी होईल. मन स्थिर न ठेवता जारकर्म केले असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास विपत्तीकाल येईल. स्‍वप्‍नामध्‍ये आयोग अशा स्‍त्रीबरोबर संग घडला तर उत्तम फल. स्‍वप्‍नात जी स्‍त्री दुर्लभ तिजशी क्रीडा करितो त्‍याला धन प्राप्‍त होते. पांढरे वस्‍त्र व पांढरे गंध धारण केलेल्‍या स्‍त्रीने आलिंगन केल्‍यास त्‍या पुरूषाचे कल्‍याण होईल.

स्‍वप्‍नात आपण ओरडतो आहो असे वाटल्‍यास दु:ख, रडत आहो असे वाटेल तर अभिवृद्धी. मारामारी करीत आहो असे पाहिल्‍यास वाईट. आपण वाळलो आहो असे स्‍वप्‍न पडले तर संसारमध्‍ये विरक्‍तपण प्राप्‍त होईल. थंडीच्‍या योगाने बाळत आहो असे पाहिले तर धनलाभ, आपण उडी मारीत आहो असे पडल्‍यास कार्यभंग व आपल्‍या शेजारच्‍या एका मनुष्‍याला मरण. आपण स्‍वप्‍नामध्‍ये मेलो असे पा‍हणे चांगले. आपण तुरूंगात आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास अधिकारवृद्धी व सभा पूज्‍यता प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नात आपल्‍यास बेड्या घातलेल्‍या पाहतो, त्‍याला चांगला पुत्र होईल असे जाणावे.

जो मनुष्‍य स्‍वप्‍नामध्‍ये उंच आसनावर बसुन जेवतो असे पाहतो तो शुद़्र असताना ही मोठा अधिकारी होतो.

भाग बारावा
परक्‍यासंबंधी
स्‍नेही मनुष्‍य मेल्‍यासारखा वाटेल तर काही संतोषाचे वर्तमान समजेल; दुसरा कोणी पायाला लाकडाचा कोवाडा बांधून चालत आहे असे पाहिल्‍यास रोगप्राप्‍ती. दुस-याला शिंगे असलेली पाहिली तर वाईट. आपल्‍यावर दुसरे कोणी रागावले असे स्‍वप्‍न पडले तर तो आपला अभिमानचा स्‍नेही होईल. आपल्‍याला कित्‍येक स्‍नेही होतील. स्‍नेहापासून निरोप घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यास दुदैव, व्‍याधी ही समोर उभी आहेत असे समजावे. जिवंत बायको मेली आहे असे जर पुरूषाने स्‍वप्‍नात पाहिले तर आवळी-जावळी मुले होतील; व त्‍यांचा गृहकृत्‍यासंबंधाने काही आश्‍चर्याचा वृत्तान्‍त ऐकेल. स्‍त्रीला आपण गरोदर बायकोशी भाषण केल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर आवळी-जवळी मूले होतील. आपण परक्‍याचे अगर अन्‍य कोणी एका मित्राचे चुंबन घेताना पाहिले तर विश्‍वासघातकी लोक आपला नाश करण्‍याचा प्रयत्‍न करतील असे समजावे.

स्‍वप्‍नात कोणी घोरत आहे असे पाहिले तर चांगले. आपल्‍या भाऊबंदापैकी कोणी मेले असे पाहिल्‍यास त्‍यांच्‍या पीडा निघून जातील. व त्‍यांना आपण मारिले असे स्‍वप्‍न पडले तर आपल्‍या पासून त्‍याजवर काही उपकार होतील आणि त्‍यांनी आपल्‍याला मारिल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर धनलाभ, दुस-याचे लग्‍न पाहिले तर शुभ, आपण एक परकी स्‍त्री बरोबर घेऊन गेल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यास नाश पुढे दिसतो. दुसरे कोणी आपल्‍याबरोबर आले असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास लाभकारक. दुस-याला फास घालताना पाहिले किंवा फास घालणाराला जी शिक्षा होते ती झाली, तर अभिवृद्धी होईल, कारागृहातील लोकांना जर आपण पाहिले तर आपला हेतू पूर्ण होणार नाही.

भाग तेरावा
खाद्यसंबंधी
स्‍वप्‍नात अन्‍न पाहणे चांगले कार्यसिद्धी दर्शवितं; आपण अन्‍न खाल्‍ले असे वाटले तर आलस्‍य, दुस-या कोणाला दिले तर धनलाभ. आपण स्‍वयंपाक करीत आहो असे पाहिले तर सेवकत्‍व प्राप्‍त होईल. किंवा स्‍त्रीसंभोग प्राप्‍ती. आपण स्‍वयंपाक करवीत असल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर लाभ. शिजविलेले नरमांस स्‍वप्‍नामध्‍ये भक्षण केले तर धनलाभ होईल असे समजावे.

क्षुधा नाही असे स्‍वप्‍न पडले तर चांगले. सदा क्षुधा लागलेली आहे असे वाटणे हे वाईट. राजांना चांगले. जेवल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर कुटुंबात आजार उत्‍पन्‍न होऊन शिवाय व्‍यापार बिघडेल. पुष्‍कळ मंडळीसह आपण जेवतो असे स्‍वप्‍न पडल्‍यास विवाह पहावयास मिळेल. भोजन करीत आहो असे पाहणे वाईट. भिंतीवर बसून जेवल्‍यासारखे वाटेल तर उद्योगलाभ होईल.

स्‍वप्‍नात भात पाहिला तर वाईट. दहीभात खाल्‍ला तर कार्यसिद्धी. पोळ्यांचा पर्वता सारखा ढीग स्‍वप्‍नात पाहिल्‍यास चांगले, व तो खाल्‍या सारखा संतान प्राप्‍ती. तो एखाद्यास दिला तर आपली कीर्ती होईल. त्‍या भिजलेल्‍या आहेत किंवा वर राख पडलेली आहे असे पाहिल्‍यास मित्रांना मरण.

स्‍वप्‍नांत लोणी पाहणे चांगले. लोणी खाल्‍ले तर उद्योग लाभ व व्‍यापारवृद्धी होईल. स्‍वप्‍नात क्षीर भक्षण करणे लाभदायक.

तळ्यात बसून कमळाचे पानावर खीर व तूप खात आहो असे स्‍वप्‍न राज्‍यप्राप्‍ती योग दर्शविते.

मनुष्‍याचे मस्‍तकाचे मांस खाल्‍ले असता राज्‍यप्राप्‍ती किंवा सहस्‍त्र धन प्राप्‍त होईल. बाहु भक्षण केल्‍यास सहस्‍त्र लाभ आणि पायांचे मांस खाल्‍ले तर शंभर लाभ. हिरवे मांस खाल्‍ल्‍यास पुष्‍कळ धन मिळेल असे जाणावे.

भाग चौदावा
पेयसंबंधी
तोंडाला कोरड पडल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर एका कार्याविषयी चिंता लागेल. गोडे पाणी प्‍याले तर शुभ. वाईट पाणी प्‍याले तर आलस्‍य इतरांना पाणी प्‍यावयाला दिल्‍यासारखे पाहिल्‍यास चांगले. दूध पाहिले तर चांगले. दूध प्‍याले तर मान मिळेल व आपले हातून सत्‍कर्म घडेल. फेसासकट दूध प्‍याले तर सोमपान, ताक पाहिले तर व्‍याधी. ताक प्‍याल्‍यासारखे स्‍वप्‍न पडल्‍यास आपली स्थिती बदलेल. दही पाहणे चांगले. दही व तूप पीत आहो असे पाहिले असता यशप्राप्‍ती. परक्‍याने आपणाला दही दिल्‍यास विद्या लाभ. तूप दिल्‍यास यशप्राप्‍ती. दूध पडत असलेली गाईची कास किंवा दूध अगर दही यांनी भरलेली घागर डोक्‍यावर घेऊन जात आहो असे पाहिल्‍यास लाभ व कुटुंबपोषण उत्तम प्रकारे होईल. दूधाचे अगर दह्याचे मडके आपण डोक्‍यावरून खाली टाकले असे स्‍वप्‍न पाहिले तर आपणास नीचदशा प्राप्‍त होईल.

सरबत पिणे सौख्‍यकारक. चहा पिणे आलस्‍यकारक. मध, रक्‍त दारू इत्‍यादी प्‍याले असता बाह्मणास विद्यालाभ व शूद्रादिकास धनलाभ समजावा. पिऊन तृप्‍त झाल्‍यासारखे वाटेल तर नव्‍या स्‍नेहापासून लाभ. दारू पिऊन उन्‍मत्त झाल्‍यासारखे पाहिले तर नाश. विष प्‍याल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर आपला सध्‍याचा काळ बदलेल. विवाहसाठी प्रयत्‍न करीत आलो असे स्‍वप्‍न पडले तर विवाहभंग होईल असे जाणावे. स्‍वप्‍नामध्‍ये औषण्‍ध पाहिले तर रोग्‍यांना चांगले व इतरांना रोगदायक. औषध प्राशन केले तर मनातील हूरहूर दूर होईल. अगर आपले रहस्‍य बाहेर पडेल. रूचीयुक्‍त असे औषध प्‍याले तर अनुकूलता. कडू किंवा तुरट औषध प्‍याले तर दांपत्‍यात कलह होईल. लोह भक्षण करणे लाभ दर्शविते.

भाग पंधरावा
धान्‍य, फळ इत्‍यादिसंबंधी
स्‍वप्‍नात गहू, हरभरे, तांदूळ, मूग ही धान्‍ये पाहिली असता धन लाभ. जोंधळे किंवा तूर पाहिली तर व्‍याधी. तीळ, मीठ पाहिले तर मृत्‍यू, साळ पाहिली तर शुभ. नागली, मसूर पाहणे वाईट. मकी पाहिली तर शुभ. धान्‍याची रास स्‍वप्‍नात पाहिली तर लाभदायक. कच्‍चे धान्‍य आपण स्‍वप्‍नात खात आहो असे पाहिले तर दारिद्र्य. धान्‍यलाभ झाला असे स्‍वप्‍नात पाहिले तर मोठा लाभ. आपण दुस-यास धान्‍य दिले तर शुभ. धान्‍य आपल्‍या अंगभर चिकटलेले आहे असे पाहिले तर धन प्राप्‍त होईल असे दर्शविते. स्‍वप्‍नात जव पाहिले तर यशप्राप्‍ती. पांढरे शिरीस पाहिले असता लाभ­.

स्‍वप्‍नात कोणतेही फळ पाहणे चांगले, ते कार्यसिद्धी व लाभ सुचविते. एखाद्या वृक्षाला अकाली फळ असे पाहिले तर रोग. फळे वेचून घेतल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर धनलाभ, किंवा संततीसौख्‍य, वडिलार्जित वाळलेल्‍या झाडास स्‍वप्‍नामध्‍ये फळे आलेली पाहणे शुभ. ती फळे आपण तोडली तर धनलाभ. पक्‍व फळांनी युक्‍त झाडा पाहिले तर धनलाभ. हिरवी फळे आलेली झाड पाहिले तर कार्यहानी. स्‍वप्‍नात आपण ऊस खात आहोत असे पाहिले तर धनहानी होईल असे जाणावे.

स्‍वप्‍नामध्‍ये खजूर, द्राक्षे इत्‍यादी फळे खाल्‍ली तर लाभ होईल. नारिंगे, संत्रे, फणस ही फळे स्‍वप्‍नात खाल्‍ली तर अंगावर फोड उठतील; व लोकांत आपला अपमान होईल. सेतूक (सीताफळे) खाल्‍ली तर सौख्‍यप्राप्‍ती. जांभूळ खाणे शुभ. आंबे, बोर, चिंच पाहिली अगर खाल्‍ली तर दूर देशचे वर्तमान समजेल व प्रियदर्शन होईल. हेच स्‍वप्‍न व्‍यापारी लोकांनी पाहिले तर चांगले. अननस पाहिले तर धंद्यात लाभ. स्‍वप्‍नात काजू पाहिले अगर खाल्‍ले तर व्‍याधी. आक्राड पाहिले तर आयुष्‍यवृद्धी. जायफळ पाहिले तर आपणावर विनाकरण एखादा आळ येईल. सुपारीची झाडे पाहणे अगर तोडणे चांगले. सुपा-या सापडल्‍या तर धनलाभ. सुपा-या खाल्‍या तर चांगले. लिंबू पाहिले तर दूरदेशाच्‍या मनुष्‍याशी संभाषण घडेल किंवा आपले बायकोबरोबर कहल होईल. लिंबू खाल्‍ले तर आपले उघडकीस येईल असे जाणावे.

सुरणाचे गड्डे पाहणे चांगले, वांगी खाणे आरोग्‍यदायक, आवळे स्‍वप्‍नात खाल्‍ले तर कीर्ती. दोडकी, गिलकी (घोसाळी), पडवळे, भेंडी खाल्‍ल्‍यास धनप्राप्‍ती. कांदे, लसूण खाल्‍ल्‍यास सौख्‍य. पालेभाजी आपण स्‍वत: खाल्‍ली तर आलस्‍य. दुसरा कोणी खात असताना पाहणे चांगले. कोणतीही भाजी आपण शिजवीत आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास आपण ज्‍या मित्रावर विश्‍वास ठेवता त्‍याजपासून आपला घात होईल असे समजावे.

मिरच्‍या, मिरी, मोह-या इत्‍यादी तिखट पदार्थ नुसते खाल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिल्‍यास आपले रहस्‍य बाहेर पडेल. किंवा आपल्‍या सेवकाबरोबर तंटा होईल. पण तेच पदार्थ वाटन किंवा कुटून खाल्‍ले तर व्‍यापारमध्‍ये तोटा होईल असे समजावे.

भाग सोळावा
अनेक वस्‍तूसंबंधी
स्‍वप्‍नामध्‍ये मोत्‍ये, जवाहीर ही पहिली असता लाभ होईल असे जाणावे. हे स्‍वप्‍न अविवाहित मनुष्‍यानी पाहिले तर त्‍याचे लग्‍न होईल. स्त्रियांना दिसल्‍यास संतत्तिदायक, व विधवा स्त्रियांना यात्रा घडेल.

घड्याळ स्‍वप्‍नात पाहिले तर चांगले, तास वाजवीत असताना स्‍वप्‍नात पाहिले तर संतानप्राप्‍ती आणि अब्रूने उपजीविका चालेल, संध्‍याकाळचे वेळी आपण तास मोजीत आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास वाईट.
आरसा स्‍वप्‍नामध्‍ये पाहिला तर दरिद्री यांना भाग्‍य व भाग्‍यवंताना दारिद्र्य प्राप्‍त होईल. आणि दापत्‍यात प्रेम वाढेल, नवीन पादत्राण धारण केल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर नूतन संभोगप्राप्‍ती, जुन्‍या पादरक्षा धारण केल्‍या तर दारिद्र्य. जो स्‍वप्‍नात वाहणा किंवा जोडा, घ्‍वज व चक्र यांतील पदार्थ आपल्‍यास मिळाले असे पाहून जागा होईल त्‍यास प्रवास घडेल. स्‍वप्‍नामध्‍ये स्‍वच्‍छ अशी तरवार, जोडा, आरसा, कापूर, चंदन पांढरे फूल यांचा लाभ ज्‍यास होईल; त्‍यास लक्ष्‍मी सदासर्वकाल प्रसन्‍न राहील.

स्‍वप्‍नामध्‍ये लाकूड पाहिले तर विवाह पहावयास मिळेल, अथवा मित्रबांधवापैकी कोणी मरेल किंवा आईचे आप्‍ताकडून धन प्राप्‍त होईल. कोणतीही एखादी वस्‍तू पाहून आपण भ्‍यालो असे स्‍वप्‍न पाहिले तर कार्यसिद्धी.

अनेक वस्‍तूंनी भरलेली दुकाने आणि जनसमुदायाने भरलेली गल्‍ली पाहणे चांगले. परंतु दुतर्फा भरलेली दुकाने असलेल्‍या रस्‍त्‍यावरून घोड्यावर बसून गेल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर नाशकारक.
लिहिलेले कागद पाहिले तर कष्‍ट. कोरे कागद पाहणे चांगले. कागद अगर पुस्‍तके घेऊन आपण जात आहो असे स्‍वप्‍न पाहिले तर नाशकारक. भिंतीला कागद लावल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर दु:ख प्राप्‍त होईल असे जाणावे.

भाग सतरावा
इतर विषयासंबंधी
स्‍वप्‍नामध्‍ये देऊळ पाहणे चांगले. देवळात बसून देवाची पूजा करीत आहो असे स्‍वप्‍न पाहिले तर कलह उद्भेल; शिवाय आपण करीत असलेली कामे बिघडतील आणि व्‍यापारी लोकांना व्‍यापारात नुकसान येईल. भजन, नाटक पाहणे चांगले सौख्‍यकारक. वीणा, सारंगी, तबला, इत्‍यादी वाजवीत असताना ऐकिले तर विवाहादी शुभकार्ये लवकरच होतील. स्‍वप्‍नामध्‍ये घंटानाद ऐकला तर लवकरच शुभ वर्तमान समजेल; आणि घरामध्‍ये विवाह होईल.

बुद्धिबळे खेळल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर आपल्‍यास मल्‍लयुद्ध करावे लागेल. जुगार खेळणे नाशकारक, पत्ते खेळत असल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर त्‍याला व्‍यभिचार घडेल. पत्ते खेळत असताना आपल्‍या हातामध्‍ये चित्रे असलेली दिसतील तर संतानवृद्धी; व नसतील तर बांझपणा प्राप्‍त होईल. चेंडूचा खेळ आपण खेळत आहो असे पाहिले तर मोठी वृत्ती मिळेल; अथवा योजिलेली कामे होतील.

फूल पाहिल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर उत्‍सव दिसेल; व ते ठेवून घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर संतोष होईल. व विवाहादी शुभकार्ये होतील. फूलाचा वास घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर सुखानुभोग; व स्‍त्रीसंभोग प्राप्‍ती. फूले वेचुन घेतल्‍यासारखी वाटतील तर कार्यसिद्धी, द्रव्‍यलाभ. फूले हातात धरली असताना ती कोमेजल्‍यासारखी दिसतील तर कार्यहानी; व्‍यापारनाश, अगर स्‍त्रीवियोग घडेल. कोमजलेले किंवा वाळलेले फूल पाहिले अगर वेचून घेतले; किंवा त्‍याचा वास घेतला; असे स्‍वप्‍न पाहिले तर कार्यहानी; कज्‍जांत अपजय, किंवा मानभंग, अगर भ्‍रातृवियोग घडेल. चोरी करून लपलेल्‍या लोकांना कोमजलेले फूल दृष्‍टीस पडेल तर चौर्यकर्म छपून जाईल. पण चांगले फूल दृष्‍टीस पडेल तर त्‍यांचे कृत्‍य उघडकीस येईल. फूल पाहिल्‍यासारखे अगर धारण केल्‍यासारखे अगर वास घेतल्‍यासारखे स्‍वप्‍न पडेल तर कीर्तिमान अशी मुले निपजतील असे जाणावे.

विष्‍टा स्‍वप्‍नांत पाहिली तर गेलेले द्रव्‍य मिळेल. ती तुडविल्‍याचे किंवा काढल्‍याचे स्‍वप्‍न पडेल तर धनलाभ. विष्‍टेच्‍या ठिगावर उभे राहिल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर शत्रुनाश, कार्यसिद्धी, पुत्रपौत्राभिवृद्धी आणि धनलाभ सुचविते.

भाग अठरावा
रोग्‍यांसंबंधी (रोग्‍यांना रोग‍प्राप्‍तीकारक)
स्‍वप्‍नामध्‍ये नागवे संन्‍यासी, गोसावी, मुंडण केलेले, मानभाव, रक्‍त वस्‍त्र व कृष्‍णवस्‍त्र पांघरलेले, नाक, कान, हात कापलेले, पांगळे, कुबडे, खुजे, कोळे, हातात परशु, तलवार, बरची इत्‍यादी शस्‍त्रे धारण करणारे, चोरास मारणारे व बांधणारे, म्‍हैस अगर टोणगा, उंट, गाढव यांवर बसलेले लोग दिसल्‍यास व पर्वत, वृक्ष इत्‍यादी उंच स्‍थानावरून पडलो, पाण्‍यात बुडालो, चिखलात रूतलो अग्‍नीत जळालो, कुत्राने पाय ओरबडले, मत्‍स्‍यानी भक्षिले, अकस्‍मात डोळे फुटले, एकाएकी दीप मालवले, तेल, मद्य प्राशन केले, लोखंड, कापूस, तीळ आणि उडिद यांची प्राप्‍ती, शिजलेल्‍या अन्‍नाचा लाभ होऊन खाणे, आडांत शिरलो, पाताळांत शिरलो इत्‍यादी प्रकार जो पाहतो तो निरोगी असला तरी रोगी होतो. व रोगी असल्‍यास मृत्‍यू पावतो.

स्‍वप्‍नात केस, दात पडणे मृत्‍यूपद होत. जो मनुष्‍य स्‍वप्‍नात शरीरास तेल, दूध, तूप किंवा अन्‍य स्निग्‍ध पदार्थानी मर्दन केलेले पाहतो त्‍याला व्‍याधी होईल असे समजावे.

स्‍वप्‍नात तांबडे वस्‍त्र धारण केलेल्‍या व तांबडे गंध लावलेल्‍या स्‍त्रीने आलिंगिले तर मृत्‍यू लवकर प्राप्‍त होईल असे जाणावे.

जो स्‍वप्‍नात अशोक, कण्‍हेर अथवा पळस हे वृक्ष फूले आलेले पाहील त्‍याला रोग प्राप्‍त होईल.

स्‍वप्‍नाचे ठायी सूर्य व चंद्र यांना निस्‍तेज पाहिले किंवा अश्वित्‍यादिक नक्षत्रे पडताहेत तसेच ध्‍-रूवादी तारे यांचे पतन पाहील त्‍याला मरण व शोक प्राप्‍त होईल.

यज्ञस्‍तंभ, पळस, वारूळ, कडुलिंब इतक्‍यांवर चढणे मृत्‍यूपद होय. विवाह करणे, तांबडे वस्‍त्र धारण करणे, नदीस अडवून आणणे, शिजलेले मांस खाणे ही नाशकारक समजावी. स्‍वप्‍नात बायको लहान मुलाला पाहि‍ल तर रोगप्राप्‍ती विधवेला पाहिले असता रोग होतो. स्‍वप्‍नात कोणी दुसरा मनुष्‍य लाकडाचा कोवाडा बांधून चालत आहे असे पाहिल्‍यास आपणास रोग उद्भेवेल. आपले हात मोडल्‍यासारखे अगर जळल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिल्‍यास मरण. परक्‍या मनुष्‍याला शिंगे असलेली पाहणे निरोग्‍यास रोग व रोग्‍यास मृत्‍यू सुचवितात, आपले डोके मोठे व उंच आहे असे रोग्‍यांनी पाहिले तर मस्‍तकशूळ व ज्‍वर जास्‍त उद्भवेल. नाकांतून रक्‍त वाहात आहे असे पाहिले तर मरण; स्‍वप्‍नात शौच व वांती ही दोन्‍ही ज्‍याला होतील त्‍याला रोग उद्भवेल. निरोप घेतल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर मृत्‍यूपद. आपण लठृठ आहो आहो असे पाहिले तर रोग प्राप्‍त होईल असे जाणावे. घराचा मागचा भाग जळताना पाहिल्‍यास मरण जवळ आहे असे जाणावे. मित्रांचे कपडे जळताना पाहणे रोगदायक. आकाश निलवर्णाकरीत आहे असे पाहिले तर रोग उद्भवेल. सूर्यास्‍त दिसेल तर मृत्‍यू.

101 टिप्‍पणियां:

  1. आणि मगर दुसऱ्या व्यक्तीस ओढून नेत आहे म्हणजे?

    जवाब देंहटाएं
  2. आणि स्‍वत:ला चमड्याची चप्पल विकत घेताना पाहिल तर

    जवाब देंहटाएं
  3. स्वप्नात एकाचवेळी सूर्य आणि दोन चंद्र पाहिले आणि एक चंद्र पौर्णिमेचा व दुसरी चंद्र कोर तर काय अर्थ होईल

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. काहीच हरकत नाही आपल्या चांगली बातमी मिळेल

      हटाएं
    2. Sir maza swapnat 1 ledies ali ani tichya payat jodhve hote ani mi tila bolty ag Tu ka ghtles jodhve tuze mister tr expired jalet kadh te adhi and ti kadat nvti (real life mdhe tya ledies che mister expired jale ahet)

      हटाएं
  4. मला जरा काही खाजगी प्रश्न विचारायचा आहे, तर तस काही कॉन्टॅक्ट करता येईल का

    जवाब देंहटाएं
  5. स्वप्नांमध्ये छोटी लहान कुत्र्याची पिल्ले मरून पडलेली आल्यास अस काय होईल?

    जवाब देंहटाएं
  6. स्वप्नात मेहंदी दुसर्या कोणी लावली असता व ती मेहंदी पुसुन टाकताच गडद रंगते. याचा अर्थ स्पष्ट करावा.

    जवाब देंहटाएं
  7. वरील स्वप्न आईस पहाटे ५ च्या सुमारास पडले. अर्थ स्पष्ट करून सांगावा

    जवाब देंहटाएं
  8. मला ईमेल वर बोलता येत नाही ़़मला मोबाईल नंबर मिळेल का

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. स्वप्नात माझा मृत्यू झालेला पाहीला, घरा जवळच आणि नंतर मी आईला दिसत होतो, मी माझी मालमत्ता आईला दिल्याचे कागद पत्र सही करताना पाहिले अर्थ काय असेल

      हटाएं
  9. Swapnat waghin tichya pillasobat disane wa tyana kathine martana swatachya kutumbachya bachav karane tyamadhye mazi aai bahin maza mulga aani shejarchya kaki disane..

    Pls yacha artha mala sangal

    जवाब देंहटाएं
  10. Andharat koni tri apla pay odht ahe, ani achank light disne khup ghabrne, ordne

    Yacha kay arth.

    जवाब देंहटाएं
  11. स्वप्नात दुसर्याच्या प्रेत यात्रेबरोबर चालणे

    जवाब देंहटाएं
  12. स्वप्नामध्ये आपण एखादी परीक्षा पास झालेलो आहोत असे स्वप्न पडल्यास अर्थ काय.

    जवाब देंहटाएं
  13. मेरी बिवी प्रॉब्लेम मी फसी हे और वो भाग रही हे वो प्रेग्नेंट हे और में उसके पीचे भाग रहा हु इस्का क्या मतलब हे प्लझ बतओ

    जवाब देंहटाएं
  14. मेरी बिवी प्रॉब्लेम मी फसी हे और वो भाग रही हे वो प्रेग्नेंट हे और में उसके पीचे भाग रहा हु इस्का क्या मतलब हे प्लझ बतओ

    जवाब देंहटाएं
  15. Swaagat undarane palila marlyache disane aani mrut vadillani ragavalyache disane

    जवाब देंहटाएं
  16. Swapnat undarane palila marlyache disane aani mrut vadillani ragavalyache disane

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. Majhya aaine, swapnat mala majhya mitrani bharpur marlel aani ghayal jhalela pahile...yacha arth kai hoil sir

      हटाएं
    2. स्वप्ना त चविष्ट पुरणपोली आणि पुरी खाल्ली ..कुणी तरी मला गरमागरम बनवून पुरणपोळी जेवायला वाढली..याचा काय आहे अर्थ?

      हटाएं
  17. दुसऱ्या माणसच असिसिडेन्ट होऊन शीर वेगळे दिसणे.. (स्वप्न ).. याचा अर्थ कळवा. धन्यवाद. sunil.Kawade1@gmail.com

    जवाब देंहटाएं
  18. आज मला एकदम 3 swapne दिसली.3)पांढरा मोर पिसारा फुलवून2)माझ्या आईचं दुसर लग्न ठरलं अणि मी ती लांब जाऊ नये म्हणुन रडून तिला अडvतेय.1)माझे बाबा माझ्या आईला रागाने फरफटत घेऊन जात आहेत. कृपया याचे अर्थ सांगावेत.

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. क्षमा असावी उत्तरर त्द्यायला वेळ झाल्यासस, आपल्या् स्वaप्ना.चे अर्थ आपल्या‍ला भविष्या त चांगली बातमी कळेल. अजुन प्रश्न असल्यातस ई-मेल वर विचारावे. udayanapkt@gmail.com

      हटाएं
  19. स्वपनात आमच्या कुटूबांचे व शेजारील कुटूबांत डोकी फुटे पर्यत भांडण झालेल पाहील. व त्या भीतीन मी दुर कुठे तरी लपून बसलो. या स्वप्नाचा अर्थ काय

    जवाब देंहटाएं
  20. स्वप्नात मला मुलगा झालाय आस कळालय मि बायकोला ओरडतोय मला पहिल का नाही सांगितल डिलेवरीवा जाते के

    जवाब देंहटाएं
  21. Maza swapnat kitchenmadhil bhint padtana ani te clean kartana kitchen katta break zala ...please sanga

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

      हटाएं
  22. उत्तर
    1. आपली संपूर्ण माहिती मिळेल का : जन्म‍ वेळ, जन्म‍ ठिकाण, आणि जन्म‍ दिनांक.

      हटाएं
  23. काळजी करण्या‍चे कारण नाही, ही नवीन बांधकाम होणार हे दर्शवत आहे. रोज मारूतीची आराधना करावे. udayanapkt@gmail.com

    जवाब देंहटाएं
  24. स्वनात हाताच्या बोटाला वाघाकडुन चावलेले पाहिले असुन विठ्ठल मंदिरात घटना घडली असे दिसते

    जवाब देंहटाएं
  25. स्वप्नात वाघाने बोटाला चावलेले बघितले आहे तेपण विठ्ठल मंदिरात

    जवाब देंहटाएं
  26. स्वप्नात आपल्या दाताच्या तीन दाढी आपण हातात घेतो त्या पैंकी एक दाढ कीडलेली आहे व तीआपण साफकरत आहोत असे दिसणे

    जवाब देंहटाएं
  27. स्वप्नात देवी, देवतांच्या मूर्ती दिसत असेल तर, याचा अर्थ काय?

    जवाब देंहटाएं
  28. स्वप्नात देवी, देवतांच्या मूर्ती दिसत असेल तर, याचा अर्थ काय?

    जवाब देंहटाएं
  29. स्वतःला बाजारात नग्न फिरताना पाहणे ह्याचा अर्थ काय

    जवाब देंहटाएं
  30. स्वप्नात आपल्या तोंडातून रक्त येत आहे आणि मी जोरजोरात रडत ओरडत आहे असे दिसल्यास याचा अर्थ काय?

    जवाब देंहटाएं
  31. मी पगंतीमध्ये जेवत आहे आणि जेवताना माझ्या ताटातील पोळ्या संपत नाही याचा अर्थ काय

    जवाब देंहटाएं
  32. Swapnat manjar mazya mulivar halla karte aani mi to halla mazyavar ghete manje nkki Kay?

    जवाब देंहटाएं
  33. सुर्यस्त होताना पाहिले तर?

    जवाब देंहटाएं
  34. स्वप्नामध्ये डावीकडे अन् उजवीकडे किंगफिशर पाहण्याचा अर्थ समजेल का...

    जवाब देंहटाएं
  35. घरात सर्व खोलीत मधमाशांचे पोळे पडलेले दिसले त्यात काही मधमाशांचे होत्या व आम्ही ते साफ करण्यासाठी तयार आहोत हे स्वप्न पडले

    जवाब देंहटाएं
  36. send your complete details like date of birth, place of birth, and time on mail udayanapkt@gmail.com

    जवाब देंहटाएं
  37. दारासमोर वाघ बसलेला दिसणे. अर्थ काय होतो ??

    जवाब देंहटाएं
  38. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं
  39. Swapnat 5 nadi bharbharun swachh panyane vahat disle tar kay arth hoto? Please sanga

    जवाब देंहटाएं
  40. Dattatreyacha photo कुणीतरी मागितला आणि तो फोटो फुटलेला पहिला याचा अर्थ काय?

    जवाब देंहटाएं
  41. पळसाच्या पत्रवलीचा ढीग पहिला याचा अर्थ काय?

    जवाब देंहटाएं
  42. चापतींचा ढीग पहिला याचा अर्थ काय?

    जवाब देंहटाएं
  43. Ek asa mandir disane jya mandirat jatana eka talav madhun java lagta ani tya talav madhe magar che lahan pillu astat khup saare pan te konala tras nai det mandirat khup thodya lokkna jau detat guruji swtaha hatala dharun geun jatat guru dev datta maharaj yanche mandir ahe te asa swpna pahila tar

    जवाब देंहटाएं
  44. स्वप्नात मंदीर पाहणे... आणि ज्ञानेश्वर माऊलीं चीन मूर्ती पाहणे

    जवाब देंहटाएं
  45. स्वप्नत एक ओढा पुराणे भरलेला वाहत असताना त्यातून वाचून रेल्वे भेटणे याचा अर्थ

    जवाब देंहटाएं
  46. स्वप्नात सख्ख्या काकांना खुप दारु पिऊन रक्ताची वांती करताना बघीतलं. याचा काय अर्थ होतो?

    जवाब देंहटाएं
  47. स्वप्नांत मित्र आजारी आहे असे पहिले

    जवाब देंहटाएं
  48. Maza Swapnat mi swatah hiravi Sadi ghalun tayar zale hote aani maza navryane mala hiravya bangadya dilya ..yacha arth Kay hoto?

    जवाब देंहटाएं
  49. Maza Swapnat mi swatah hiravi Sadi ghalun tayar zale hote aani maza navryane mala hiravya bangadya dilya tyacha arth Kay hoto?

    जवाब देंहटाएं
  50. जातिवाचक आणि त्यांची विटम्बना बंद करा

    जवाब देंहटाएं
  51. Swapnat maza navara dusrya mulikde pahto ahe ektak... Tehi mazyasamorach... As distay yacha arth?

    जवाब देंहटाएं
  52. स्वप्नात मोठे लवंग दिसले प्लेट भरून

    जवाब देंहटाएं
  53. स्वप्नात गहु टोकुन शेतास पाणी पाजने..

    जवाब देंहटाएं
  54. आणि घड्याळ तोडणे आणि कोणाला तरी पैसे देणे

    जवाब देंहटाएं
  55. स्वापांनात market मधील सर्व दुकाने पडलेली पण माझा मित्राचे दुकान चालू दिसणे आणि मी माझा मित्रा सोबत बोलत उभा होतो त्याचाच दुकानसमोर

    जवाब देंहटाएं
  56. स्वप्नात प्रलय प्रत्यक्ष अनुभवणे
    प्रलयंकारी पुर आणि वादळ यापासून स्वतःला वाचवताना प्रयत्न करीत असताना *श्री स्वामी समर्थ* हे नाव 3 वेळा घेताच सर्व प्रलय वादळ शांत झाले
    सोबत दोन कोणीतरी ओळखीच्या व्यक्ती पण त्या घरातील सख्या नाही.
    त्या प्रलयातून *स्वामी नाम* घेऊन स्वतःला वाचवत असताना एका घरासारख्या वास्तूत आहोत, तिथे एका खोलीत छोटेसे देवघर आणि त्याबाहेर अगरबत्ती जळताना दिसतेय.
    स्वामी नाम घेत असताना अचानक एक लहान मुलगी आम्हाला दिसते..
    ती बागडत त्या देवघर ठेवलेल्या खोलीतून येते आणि आम्ही आश्रयाला थांबलेल्या खोलीतून आत दुसऱ्या खोलीत निघून जाते
    वादळ थांबल्यानंतर माझा चुलत भाऊ आणि मी त्या मुलीला बघायला जातो ती आम्हाला भेटते आम्ही तिला या संकटात ती पण एकटीच आहे या विचाराने तिला पण आमच्यासोबत घेतो..
    नंतर काही ओळखीची माणसे या सर्व प्रकारामुळे (वादळ पुरामुळे) रस्त्यावर मोर्चा घेऊन किंवा मदती करीता निघाल्यासारखी चालताना दिसतात.
    त्यावेळी माझे घरचे कसे असतील या विचाराने घाबरून मी झोपेतून जागी होते
    (जागे व्हायची वेळ सकाळी 5:25)
    त्या आधी घरातील व्यक्ती (आई, राहुल, राकेश आणि इतर कोणी दिसत नाही आणि माहीत नाही पण त्यांचं अस्तित्व आहे) काही ओळखीच्या व्यक्ती सोबत सर्वसामान्य जगणं जगत आहे ( कुठल्यातरी ( गणिताच्या) परीक्षेची तयारी चालू आहे ) असे दिसते.. नंतर 1-2 ओळखीच्या व्यक्तीसोबत कुठल्यातरी परीक्षेला किंवा पेपर द्यायला निघणं. (आकाशवाणी आणि दुसरं कोण ते नाही माहीत)

    *(परीक्षेला निघण्या आधी आकाशवाणी सोबत जायचे असते पण
    जाताना राकेश सोबत असावा बहुतेक आणि अजून कोण ते दिसत नाही पण आहे आणि त्यावेळी नॉर्मल पाऊस पडत होता)
    पण काही वेळाने अचानक पुराच्या लाटांनी आमचा पाठलाग करणं, त्यापासून वाचण्यासाठी एका घरात शिरणं, त्याच घरात असताना विध्वंसक वादळ आमच्याकडे येताना बघणं, त्यावेळीच नेमके *श्री स्वामी समर्थ* हे नाव घेत असताना दुसऱ्या खोलीत छोटे देवघर, जळत असलेली अगरबत्ती दिसणं, आणि छोटी मुलगी बागडत जाताना दिसणं (या एकूण वातावरणाचा तिच्यावर कसलाही परिणाम झालेला दिसत नव्हता.. फक्त ती एकटी होती)

    जवाब देंहटाएं
  57. स्वप्नात महादेवाच्या 4 पिंडीचे दर्शन आणि त्यांना जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या जवळील एका छोट्या फुटभर आकाराच्या व फुटभर खोल कुंडात माझा तोल जाऊन पडणे,पण नंतर बाहेर आल्यावर त्या कुंडातील पाण्याचा ओलसरपणा न जाणवणे...

    जवाब देंहटाएं
  58. आपल्याे सगळ्यांना वि‍नंती की आपण मला ई-मेल किंवा माझ्या मोबाईल वर वॉटसप करावे.
    ई-मेल udayanapkt@gmail.com
    मोबाईल 7382771120

    जवाब देंहटाएं
  59. स्वप्नामध्ये बैल आणि वाघ यांची मारामारी

    जवाब देंहटाएं
  60. स्वपनात जर आपण एखादे झाड लवत आहे असे दिसल्यास काय अर्थ होतो.

    जवाब देंहटाएं
  61. माझ लग्न झालेले आहे..तरीही स्वप्नामध्ये पुन्हा माझे लग्न माझ्याच नवर्‍या सोबत झाले.असे असले तर काय अर्थ होतो.

    जवाब देंहटाएं
  62. मला माझी मुलगी स्वप्नात उंची वरून पडताना दिसली. या प्रकारची स्वप्ने दोन वेळा पडली. याचा अर्थ काय आहे.

    जवाब देंहटाएं
  63. शत्रू तलवार घेऊन घोड्यावर बसून मागे लागले आणि त्यांच्या बचावापासून सोबत्यासोबत पाण्यात उडी मारणे दिसल्यास काय होईल

    जवाब देंहटाएं