काल्पनिक प्रेम कहाणी .... "३० दिवस"

मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात.

मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेच ह्या जगामध्ये राहिलो आहोत ... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत!!

मुलगी :- मलाही हेच वाटते कारण माझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमात आहेत.

मुलगा :- आता काय करायचे?

मुलगी :- आपण एक खेळ खेळूया!!

मुलगा :- खेळ ... कोणता खेळ?

मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बनुयात!!

पहिले १ ते ५ दिवस :- ते सिनेमा पाहतात , भरपूर फिरतात!!

६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते आणि त्याचा हाथ पकडते पण नंतर लक्षात येते कि तिने चुकून दुस-याचाच हाथ पकडला आहे ...... दोघे ही हसतात. बाहेरच एक ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य त्याला विचारतात, तो म्हणतो " तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या, आणि आनंदात रहा .... आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ........"

१६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते .....ती मुलगी काहीतरी पुटपुटते .....

२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याच बागेत त्याच जागेवर येउन बसतात.

मुलगा :- मी तुझा एपल जूस घेऊन येतो असे म्हणून तो तेथून जातो !!२० मिनिट नंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो :-

तो मुलगा तुम्हा बॉयफ्रेंड आहे का ?
मुलगी :- हो ! का ? काय झाले ?

अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे!!

हरणाच्या गतीने ती अतिशय दुखित होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ......
२९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात व
त्या मुलीच्या हाथात एपल जूस व पत्र देतात!! ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे
मी तुझ्या बरोबर घालविले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते .. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा हि माझी इच्छा होती
!!

मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही, मी तुला मरून देणार नाही ...... चांदणी पडल्यावर मी तुलाच मागितले होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ........ आता मला कळाले
कि तो ज्योतिषी का रडला होता, पण मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज मला सोडून नको जाऊस प्लीज
......

I Love You, I Love You, I Love you very very much !! ........ तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ...... मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते ....... तो ३० वा दिवस होता !!!
कोणीतरी खरच म्हंटल आहे कि "अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं "

1 टिप्पणी:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...