चोरांनी शिकवला धडा!


आम्हाला दोनदा चोरट्यांचे अनुभव आले आणि त्यातून दोनदा आम्ही बचावलो. एकदा दिवा लागल्यामुळेतर दुसऱ्यांदा दिवा मालवला गेल्यामुळे! या सगळ्यातून एक महत्त्वाचा धडा आम्ही शिकलो
- बाहेरगावी जाताना घरातला मेन स्विच ऑफ करण्याचा! साधारण 1993-94 मधील गोष्ट. मी आणि माझे आईवडील शेजारी शेजारी राहत होतो. आमच्या घराची मधली भिंत कॉमन होती. आई-वडिलांचे साधारण वय 75  70 च्या आसपास होते. ते मुलांकडे मुंबईला आणि पुण्याला वर्षातून दोन वेळा महिना महिना राहायला जायचे. अर्थातच त्यामुळे त्यांचे घर तेव्हा बंद असायचे. मी त्यांच्या घराकडे लक्ष देत असे.

असेच माझे आई-वडील माझ्या भावांकडे बऱ्याच दिवसांसाठी राहायला गेले होते. मे महिन्याचे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मीमाझे यजमान व मुलगी गच्चीवर झोपण्यास जात असू. त्या दिवशी माझे यजमान मध्यरात्री अचानक जागे झाले. गच्चीवरूनच ते चाहूल घेऊ लागले. तोच त्यांना आमच्या घराच्या शेजारच्या खिडकीच्या काचेतून घरातून प्रकाश बाहेर पडलेला दिसला. वरूनच खाली बघितलेतर ओट्यावरचा दिवाही लागलेला.

"
का गं रात्री अण्णा आणि अक्का गावाहून परत आले का?''

"छे! नाही.'' मी अर्धवट झोपेतच म्हटले.

"मग जरा ऊठ बघू.''

"का होकाय झाले?''

"अण्णांच्या घरातून खिडकीतूनही बाहेर प्रकाश पडतोय. काल तू वर येताना त्यांच्या घरातील दिवे नीट बंद केले होतेस की नाहीओट्यावरचा दिवाही चालू आहे.'' "कायम्हणत मी ताडकन उठले. गच्चीवरूनच टेहळणी केली. खरोखरीसच घरातले सर्व दिवे सुरू होते. आणि ओट्यावरचादेखील! "अहोपण मला नक्की आठवतंयमी सगळे दिवे बंद केले होते.'' "मग नक्कीच अण्णांच्या घरात कुणीतरी घुसले आहे...'' "आता काय करायचे?'' घरात चोर घुसल्याची खात्री झाली.

मग माझ्या यजमानांना एक युक्ती सुचली. अक्काने परसातील तोडलेल्या झाडाच्या फांद्या सुकण्यासाठी गच्चीवर वाळत टाकल्या होत्या. त्या फांद्या आम्ही घेतल्या. मुलीलाही उठवले. तिघांनी तीन दांडकी हातात घेतली. आणि जिन्यावरून जोरजोरात पावले आपटण्यास सुरवात केली. दांडकी जिन्याच्या पडदीवर आणि घराच्या भिंतीवर आपटत आपटत जिना खाली उतरलो. ओट्यावर चढून घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी घातली. कडी-कोयंडा तसाच होता! कुलपाचा दांडा कापून चोर घरात शिरले होते. मग मागच्या दाराकडे अंगणातून फेरी मारून गेलो. आणि चांगलेच चरकलो. मागचा दरवाजा उघडा होता. आणि दिवाही चालू होता. मोठ्या हिकमतीने मग मागच्या दारालाही बाहेरून कडी घातली. कारण चोरांनी आतून बंद केलेला दरवाजा उघडला होता.

प्रसंग पाहून पोलिस स्टेशनला फोन केला. दहा-पंधरा मिनिटांनी पोलिस व्हॅन आली. त्यांनी पाहणी केली. त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन सकाळी लेखी तक्रार करा म्हणून सांगितले. व्हॅन निघून गेली. सकाळी अण्णांना तार केली. अक्का आणि अण्णा आले. पोलिसांच्या देखरेखीखाली घर उघडले. निरीक्षण केले. घरातली सारी कुलपे इलक्‍ट्रिक करवतीने (कटरने) कापलेली होती. आणि घरातले सारे किमती सामान मागच्या दरवाजापर्यंत झटकन गोळा करता यावे व घेऊन जाता यावे म्हणून सरळ रांगेने मांडून ठेवले होते. सगळ्याच सामानाची उलथापालथ केलेली होती. मागच्या दाराशीच लेदरची नवे कपडे ठेवलेली बॅग उघडी पडली होती. त्याचे हॅंडल (तुटलेले) जवळच पडले होते. बऱ्याच चीजवस्तू वाचल्या होत्या. आमच्या जागे होण्यामुळे चोर मागच्या दाराने हाती लागले ते घेऊन पसार झाले होते. तरीसुद्धा थोडी रोख रक्कम आणि काही वस्तू चोराने जाता-जाता नेल्याच होत्या. दुसऱ्यांदा चोर पुन्हा त्यांच्या घरात घुसल्याचा पत्ता लागलातो दिवे चोरांनी विझवल्यामुळे!... आम्ही नेहमीप्रमाणे अण्णांच्या घरातले सारेच दिवे बंद करत असू. तेही माझ्या भावांकडे थोडे दिवसांसाठी गावाला गेले होते. पण एक दिवस गस्त घालणारा पोलिस आमच्या दारापाशी आला. आणि आमचे दार ठोठावून ठणकावून म्हणाला,

"हे घर बंद का असतेइथे कोण राहते?''

"हे घर माझ्या आई-वडिलांचे आहे. ते सध्या गावाला गेलेत.''

"इथे दिवा लावत जा रोज रात्री! ओट्यावर आणि अंगणात उजेड हवा.''

त्या दिवसानंतर मी रोज ओट्यावरचा लाईट लावू लागले. मध्यरात्री अशीच जाग आली. गच्चीवरून पाहतोतो ओट्यावरचा दिवा बंद होता... "का गंआज ओट्यावरचा दिवा लावायला विसरलीस का?'' "नाही. मी गच्चीवर येताना दिवा सुरू ठेवून आले.'' "मग दिवा बंद कोणी केला?'' "पुन्हा काहीतरी झालेलं दिसतंय. चल खाली.'' "कोण आहे आत?'' "काय करता आहात?'' आवाजाच्या जरबेने आणि आम्ही जागे झालो या जाणिवेने दोघे जण मुख्य दरवाजातूनच बाहेर आले. हातात एक मोठा दगड होता. तो आमच्या दिशेने जोरात भिरकावला. आणि दोघांनी ओट्यावरून मागच्या दिशेने अंगणातून उड्या टाकल्या. जवळच खाली मोठी घळ होतीच. त्यात उड्या मारल्या आणि पसार झाले. मागच्या वेळेप्रमाणेच पोलिस व्हॅन आली. पोलिस स्टेशनात फिर्याद नोंदवली. अक्का आणि अण्णा आले. दार उघडून बघितले. आम्हाला लवकर जाग आल्यामुळे या वेळी चोरांच्या हाती काहीच लागले नाही.

एकदा दिवे लावलेले दिसले म्हणूनतर दुसऱ्यांदा दिवे विझवले म्हणून आम्हाला घरात चोर घुसले आहेत हे कळले. मात्रआम्ही तेव्हापासून एक धडा शिकलो. तो म्हणजे - कुठेही गावाला घर बंद करून जाताना घरातील मेन स्विच ऑफ करून मगच जाणे!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...