आपण सगळे मिळुन प्रगत भारत निर्माण करुया!

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला "मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टीका करण्यामधे कमीपणा वाटत
तर नाहीच, उलट एक प्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्धा आपल्या जंगलाला एव्हडी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा कां?" हा अमेरीकन माणुस स्टॅनफोर्ड या प्रसिध्‍द विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता. अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारता
विषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, "तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना स्वातंत्रय मिळुन 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्रय मिळून फक्त 60 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे."
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, "तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्रय मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसीडेन्ट असो किंवा ब्रीटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा-फार तरी ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुध्धा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी यूरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्‍या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदललते (त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विवीधता असुनही तुमचा देश अजुनही एकसंध आहे हीच आमच्या द्रृष्टिने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजुन जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्‍या लोकांमधे ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडुन देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे."

अमेरीकेतील एक प्रसीध्द सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणुनच प्रसिध्ध आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, "भारता पुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे "एकमेव द्वितीय (Unique) आहेत. जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मिळणार नाहीत. भारतियांनाच या समस्यांवर तोडगा शोधून काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक या मधे यशस्वी होतील. येव्हडे असुन ही भारताने जी प्रागती केली आहे ती खरोखरच कौतुकस्पद आहे." हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात. असाच एक अमेरीकन इंजिनीयर भेटला. तो कांही वर्षे भारतात राहुन गेला आहे. भारतामधे प्रात्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना आहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, "तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबून आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबून असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणीकपणा व पारदर्शीपणा, करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणुन दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवुन लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहून कायदे कानुन पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापसुनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नगरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते."

मी मुद्दमुनच अमेरीकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हणून. येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्‍वातंत्रय मिळुन 64 वर्षे होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशावीषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरीचे आहे.

१. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे.

२. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करु शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेऊन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उध्धटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार?

३. आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणुस येइल याची वाट बघायची. नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणारयाचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

४. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रगती केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे, सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहेसरकारच्या नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोणते कोणी परग्राहावरुन आलेले लोक नाहीत. ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.

चला तर! आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करुया! !

1 टिप्पणी:

  1. हे झान लि‍हलेले ब्‍लाग आहे मी आपली आभारी आहे कि‍ आपण हे ब्‍लाग आमच्‍या पर्यंत पोचवल्‍या बद्दल
    .
    .।

    जवाब देंहटाएं

Related Posts Plugin for WordPress, Blogger...